Download App

Manipur Violence : ‘त्या’ नराधमांचे हात छाटले पाहिजे…अमित ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

Manipur Violence  मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठा तणाव पाहायला मिळतो आहे. दिवसेंदिवस या ठिकाणची परिस्थिती चिघळू लागली आहे. दरम्यान हे सगळं सुरु असताना मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध म्हणून देशभर लोक रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवत आहेत. याप्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दवी आहे. महिलांची अशी अवहेलना करणाऱ्या त्या नराधमांचे हात छाटले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. (manipur-violence-Amit Thackeray’s angry reaction to Manipur incident)

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते आज छत्रपती संभाजीनगर येथून नगरला येण्यासाठी निघाले असता त्यांचे नेवासा येथे देखील जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान नगर शहरात अमित ठाकरे आले असता त्यांचे विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी इंपेरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने मनसैनिकांनी गर्दी केली होती.

अमित ठाकरेंचं वक्तव्य बालिश, इर्शाळवाडीचं राजकारण नको; गिरीश महाजनांची टीका

त्यानंतर अमित ठाकरे यांचा ताफा थेट पत्रकार चौकातील सारडा कॉलेजमध्ये दाखल झाला. यावेळी त्यांचे हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कॉलेज प्रशासनाच्या वतीने ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी औपचारिक चर्चा केली. त्यानंतर जमलेल्या विद्यार्थ्यांशी टप्प्याटप्प्याने दिलखुलास संवाद साधला आहे.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देविदास खेडकर, शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, इंजि. विनोद काकडे, अनिता दिघे, नितीन भूतारे, चंद्रकांत ढवळे, आदी पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us