Download App

जरांगेंच वादळ पुन्हा घोंगावणार, महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला 1 डिसेंबरपासून सुरूवात

  • Written By: Last Updated:

Fourth Maharashtra tour :  राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यासााठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा जरांगेंनी पत्रकार परिषदे गेऊन चौथ्या टप्यातील महाराष्ट्र दौऱ्याची माहिती दिली. त्यामुळं जरांगेचं वादळ पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोंगावणार आहे.

Supriya Sule : मंंत्र्यांना जरा आवरा, अन् जाहीर माफी मागा; भावी शिक्षकाला धमकी देणाऱ्या मंत्र्याला सुनावलं 

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि ओबीसी हक्कांसाठी भुजबळ आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्याकडून एल्गार सभाचं आयोजन केलं जातं. जरांगेही मागे हटालया तयार नाहीत. तिसऱ्या टप्यातील दौऱ्यानंतर आता त्यांनी चौथ्या टप्यातील दौऱ्याची घोषणा केली. आज पत्रकार परिषदेत बोलतांना मनोज जरांगेंनी चौथ्या टप्यातील दौऱ्याची माहिती दिली.

Bigg Boss 17 Update: ऑरीने एका दिवसातच सोडला ‘बिग बॉस’ शो, नेमकं कारण काय? 

मराठा समाजाचा आशिर्वाद घेण्यासाठी पुन्हा एकदा दौरा करणार आहे. 1 डिसेंबर पासून दौऱ्याची सुरूवात होणार आहे. जालना पासून दौऱ्याला सुरूवात होणार असून छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, मलकापूर, खामगाव, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, बीड जिल्ह्यात सभा होणार असल्याचं जरांगेनी सांगितलं. आरक्षण असलेल्या मराठा आणि आरक्षण नसलेयल्या मराठ्यांनी आता आरक्षणासाठी एकत्र यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं.

कसा असेल चौथ्या टप्यातील दौरा
1 डिसेंबर – जालन्याल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यक्रम आहे.
2 डिसेंबरला – लालसावंगी (जि. छत्रपती संभाजीनगर), कोलते पिंगळगाव (जि. जालना), कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर)
3 डिसेंबर – चाळीसगाव( जि. जळगाव), धुळे, जळगाव
4 डिसेंबर – मुक्ताईनगर (जि. जळगाव), मलकापूर (जि. बुलढाणा), खामगाव (जि. अकोला) शेगाव
5 डिसेंबर – चरणगाव(ता. पातुर), काटा (जि. वाशिम), हिंगोली
6 डिसेबर – दिग्रस (जि. हिंगोली), पुसद (जि. यवतमाळ) कोंडूर (जि. यवतमाळ), माहूरगड
7 डिसेंबर – उमरखेड, वारंगा फाटा(जि. हिंगोली), नांदेड
8 डिसेंबर – जिजाऊनगर (जि. नांदेड), मारताळालोहा, नर्सी, कंधार
9 डिसेंबर – जांमगाव जळकोट(जि. लातूर), उदगीर (जि. लातून) निलंगा (जि. लातूर)
10 डिसेंबर – औसा (जि. लातूर), टेभी, किल्लारी, आवंडा, उमरगा(जि. धाराशिव)
11 डिसेंबर – मुरूड (जि. लातूर), अंबेजाोगाई (जि. बीड)
12 डिसेंबर – बोरी सावरगाव (जि. बीड) धारूर (जि. बीड) माऊलीफाटा, अंतरवली (जालना)

 

Tags

follow us