Bigg Boss 17 Update: ऑरीने एका दिवसातच सोडला ‘बिग बॉस’ शो, नेमकं कारण काय?

Bigg Boss 17 Update: ऑरीने एका दिवसातच सोडला ‘बिग बॉस’ शो, नेमकं कारण काय?

Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तितकाच जोरदार चर्चेत असणारा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस.’ (Bigg Boss ) बॉलिवूडचा भाईजान (Salman Khan) सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस 17 हा (Bigg Boss 17 ) शो होस्ट करत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकताच या शोमध्ये ओरहान अवतरमणी (Orhan Awatramani ) म्हणजेच ऑरी सहभागी झाला होता. मात्र एकाच दिवसात त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. परंतु त्यामागचे नेमकं कारण काय?

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


शुक्रवारी बिग बॉसच्या घरात ‘वीकेंडचा वार’ हा एपिसोड पार पडला. या भागामध्ये ऑरीची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली. परंतु दर रविवार प्रमाणे काल, जस्ट चिल विथ सोहेल अँड अरबाज सेशन झाले होते. यामध्ये अरबाज खान आणि सोहेल खानने स्पर्धकांसोबत चाहत्यांचे जोरदार मनोरंजन केले होते. यावेळी ओरीची खिल्ली उडवली गेली. मात्र जाता-जाता अरबाज आणि सोहेल ऑरीला घराबाहेर घेऊन गेले आहे. ऑरी हा फक्त एक दिवसाकरिता या शोमध्ये आला होता, असे अरबाज-सोहेलने सर्वांना सांगितले आहे. अशाप्रकारे ऑरी एका दिवसात घरातून बाहेर पडावे लागले आहे.

खरं तर ऑरी हा वाइल्ड कार्ड स्पर्धक नव्हता. तो चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी केवळ शोमध्ये आला होता. ते ऐकून सर्वच स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे. ऑरी एकाच दिवसात घरातून बाहेर आल्याने चाहत्यांनी देखील मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

‘राजकुमार कोहलींच्या शोकसभेत हसल्यानं सनी देओल ट्रोल’; नेटकरी म्हणाले, ‘निर्लज्जपणा….’  

कोण आहे ऑरी?

ऑरीचे पूर्ण नाव ओरहान अवतरमणी असे आहे. त्याने तमिळनाडूमध्ये त्याचे शिक्षण घेतले आहे. 12 वी पास झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ऑरी कोलंबिया यूनिवर्सिटीमध्ये गेला. 2016 साली ऑरी आणि सारा अली खान एकत्र ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ऑरी हा अंबानी कुटुंबीयांच्या देखील जवळचा आहे. ऑरीच्या लिंक्डइन प्रोफाइलच्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या चेअरपर्सनसोबत ऑरीने एक प्रोजेक्ट केला होता. तो गेल्या काही वर्षांपासून रिलायन्स इंडस्ट्रीसाठी काम करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube