‘राजकुमार कोहलींच्या शोकसभेत हसल्यानं सनी देओल ट्रोल’; नेटकरी म्हणाले, ‘निर्लज्जपणा….’

‘राजकुमार कोहलींच्या शोकसभेत हसल्यानं सनी देओल ट्रोल’; नेटकरी म्हणाले, ‘निर्लज्जपणा….’

Raj Kumar Kohli Prayer Meet: ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार कोहली (Raj Kumar Kohli ) यांचे 24 नोव्हेंबर दिवशी मुंबईत निधन झाले आहे. आंघोळीला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.. रविवारी (26 नोव्हेंबर रोजी) त्यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. अभिनेता सनी देओल कोहली (Sunny Deol) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेला होता, (Sunny Deol Trolled) मात्र त्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)


व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसतंय की सनी देओल आणि विंदू दारा सिंग आणि आणखी एकजण तिथे एकमेकांशी बोलत आहेत, नंतर ते जोर- जोरात हसतात. तर त्यांच्या पुढे दिवंगत राजकुमार कोहली यांचा मुलगा अरमान उभा आहे आणि लोक त्याचे सांत्वन करत आहेत. मग सनी तिथून पुढे येतो आणि अरमानची भेट घेतल्याचे दिसत आहे, आणि नंतर ते तिथून पुढे जातात.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ही पार्टी आहे का?’ ‘निर्लज्ज, मृत व्यक्तीच्या मुलासमोर का हसत आहेत’, ‘अंत्यसंस्काराच्या वेळी हसण्याची ही वृत्ती पाहून खूप वाईट वाटले’, ‘एखाद्याच्या मरणावर खूप हसू येत आहे यांना’, ‘शोकसभा सभेत हसणे किती अपमानास्पद आणि लाजिरवाणे …,’ अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी सनी देओलला ट्रोल केले आहेत

Filmfare Ott Award 2023: आलियाने ओटीटी पुरस्कारामध्ये मारली बाजी, ‘या’ कलाकारांचाही झाला सन्मान!

अरमान कोहलीचा मित्र विजय ग्रोव्हरने राजकुमार कोहली यांच्या निधनाची माहिती दिली होती. “राजकुमार कोहलींचं निधन झालं. ते सकाळी 8 वाजता आंघोळीसाठी गेले होते, मात्र बराच वेळ बाहेर न आल्याने अरमानने बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी राजकुमार कोहली आत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता,” असं विजयने यावेळी सांगितलं होतं.

netizens comments on sunny deol vindu dara singh

सनी देओलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सनी देओल शेवटचा गदर 2 मध्ये दिसला होता. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube