Download App

मराठ्यांचं वादळ पश्चिम महाराष्ट्रात येणार, जरांगेंनी बोलावली महत्वाची बैठक

मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समन्वयकांची बैठक बोलावली

अहमदनगर – मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) लढाईसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समन्वयकांची बैठक बोलावली आहे. धाराशिव (Dharashiv) येथे पार पडणाऱ्या या बैठकीसाठी नगर जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक गोरख दळवी (Gorakh Dalvi) यांनी दिली.

Shruti Marathe : श्रुती मराठेच्या फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष 

राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसून येत्या काळामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसीच्या नेत्यांकडून घेतली जात आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आरक्षणाची लढाई तीव्र होताना दिसते आहे. अशातच मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले. 6 जुलैपासून ही शांतता रॅली सुरू झाली असून 13 जुलैपर्यंत ही रॅली असणार आहे. काल ही रॅली हिंगोलीत काढण्यात आली. आता हीच रॅली हिंगोली तसेच संभाजीनगर मार्गे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा येणार आहे. त्यासाठीच जरांगे पाटील पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक तसेच मराठा समाज बांधव यांना 10 जुलै रोजी धाराशिव येथे बैठकीला बोलावले आहे.

Maharashtra Assembly Election : मविआचं जागा वाटप कसं होणार? पवारांनी सांगितला डिटेल फॉर्म्युला 

जरांगे यांच्याशी विचार विनिमय करूनच शांतता रॅलीचे नियोजन केले जाणार आहेत. तसेच येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यामुळे आपलेच माणसं उमेदवार म्हणून द्यायचे की नाही. किंबहुना नेमकी निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असणार? याबाबतची चर्चा देखील यावेळी होणार असल्याची माहिती यावेळी दळवी यांनी दिली.

दरम्यान, काल हिंगोली बोलतांना जरांगेंनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, मराठ्यांवर अन्यायच केला तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल. आरक्षण ही काही एकट्या छगन भुजबळ यांची मक्तेदारी नाही, छगन भुजबळांचं ऐकून जर आमच्यावर अन्याय होत असेल तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडूण येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे.मराठ्यांना 13 तारखेच्या आत आरक्षण द्या. तसे झालं नाही तर झालेला निर्णय तुम्हाला झेपायचं नाही, असा इशारा जरांगेंनी दिला.

follow us