Manoj Jarange : ओबीसीमधून (OBC) मराठा समाजासाठी आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 20 जुलैपासून पुन्हा एकदा या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहे. मात्र त्यापूर्वी आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ एके छगन भुजबळ आमचा विरोधक आहे बाकी कुणी नाही. असं मनोज जरांगे म्हणाले. आज जालन्यात ते बोलत होते.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ एके छगन. भुजबळ आमचा विरोधक आहे बाकी कुणी नाही. लोकसभा निवडणुकीत भुजबळपेक्षा जास्त लोक महादेव जाणकरांनी (Mahadev Janakar) निवडून आणून दाखवले. तुम्ही काय केलं? जाणकार भुजबळच्या नादी लागत नाही, म्हणून तो पुढे आहे. अशी टीका पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
तर यावेळी त्यांनी भाजप नेते प्रसाद लाडवर (Prasad Lad) देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्यावर टीका करत मनोज जरांगे यांना DD म्हणजे देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याची टीका केली होती तर आता पाटील यांनी यावर प्रसाद लाड यांना प्रतिउत्तर देत विनाकारण कोणताही रोग झाला म्हणू नका, समाजाला न्याय देण्याचे काम करा, तुम्ही वयाने मोठे आहेत म्हणून तुम्हाला दादा म्हणतो, तुम्ही फक्त फडणवीस यांना खोट्या केसेस करायला लावू नका आणि रेकॉर्ड शोधायचे काम सुरु करा अशी टीका आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी प्रसाद लाडवर केली.
तसेच त्यांनी यावेळी सरकारच्या योजनेंवर देखील टीका केली आहे. सरकारने सर्व मुलींना शिक्षण मोफत केले तर मग अटी शर्ती कशाला ठेवल्या असा सवाल उपस्थित करत त्यांनी सर्व अटी शर्ती हटवण्याची आणि ,ओबीसींच्या सवलती मुलींना लागू करण्याची मागणी केली आहे.
तर शरद पवार यांच्याकडून मनोज जरांगे यांचा राजकीय गेम होत असल्याची टीका भाजप आमदार अमित साटम यांनी केली होती. यावर देखील जरांगे पाटील यांनी उत्तर देत विनाकारण भांडण विकत घेऊ नका.
Crowdstrike आहे तरी काय? ज्याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला, वाचा सविस्तर
भुजबळ आणि आम्ही बघून घेऊ, आम्ही बोलतो भुजबळांना आणि उत्तर देता तुम्ही. तुझा आणि भुजबळचा संबंध काय याचा उत्तर द्या, मानला थोडंतरी वाईट वाटू द्या अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. तसेच मी सुद्धा वाघनखे बघायला जाणार आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.