बारामती लोकसभेसाठी महादेव जानकरांनी पुन्हा थोपटले दंड; सुप्रिया सुळेंना देणार टक्कर

बारामती लोकसभेसाठी महादेव जानकरांनी पुन्हा थोपटले दंड; सुप्रिया सुळेंना देणार टक्कर

Mahadeo Jankar : बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati LokSabha Constituency)हा आपला आत्मा आहे. बारामतीची जागा त्यासाठीच मागितली आहे. बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची आपली अंतिम इच्छा असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर(Mahadeo Jankar) यांनी सांगितले. महादेव जाणकर यांनी आज पंढरपूरमधील(Pandharpur) संत नामदेव पायरीपासून जनस्वराज्य यात्रेला(Jan Swarajya Yatra) सुरुवात केली. त्याचवेळी भाजपाने आपल्याला आगामी लोकसभा निवडणुकीत हव्या असलेल्या पाच जागा दिल्या तरच एनडीएमध्ये (NDA)राहू अन्यथा आपल्याला सर्व पर्याय खुले आहेत, असा इशाराही महादेव जानकर यांनी दिला आहे.(Mahadeo Jankar Baramati Lok Sabha Constituency willing to contest supriya sule)

काका-पुतणे येणार एकाच मंचावर; PM मोदी, CM शिंदेंच्या उपस्थितीत होणार भेट

महादेव जानकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत आपली बारामती मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. बारामती माझा आत्मा आहे. एक दिवस आपण देशाचे पंतप्रधान होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार, तेही आपल्या सहकाऱ्यांच्या जोरावर इतर कोणाचीही मदत न घेता, असेही यावेळी जानकर म्हणाले. आमची आघाडी कोणाबरोबरही होऊ शकते, पण आपली इच्छा एकच आहे, ती म्हणजे बारामतीमधून लोकसभा लढण्याची, असेही यावेळी जानकर म्हणाले.

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प वादात, थेट करार तोडला

त्याचवेळी जानकर यांनी सांगितले की, आपण आगामी लोकसभा ही महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांमधून लढणार आहे. महाराष्ट्राबाहेर आपली भाजपसोबत युती नसल्यामुळे राज्याबाहेर आपण स्वतंत्र लढणार असल्याचेही जानकर म्हणाले. त्याचवेळी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, सांगली, परभणीसह ईशान्य मुंबई या पाच जागा दिल्या तरच भाजपमध्ये आपण राहणार अन्यथा वेगळे पर्याय खुले असल्याचा इशारा जानकर यांनी दिला आहे.

त्याचबरोबर राज्यात भाजप नवीन मित्र (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार) जोडत असताना जुन्या मित्रांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची खदखद जानकरांच्या बोलण्यातून जाणवत होती. त्याचवेळी जानकर यांनी सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून जनता हुशार असते, असा टोलाही भाजपाला लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube