Crowdstrike आहे तरी काय? ज्याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला, वाचा सविस्तर

Crowdstrike आहे तरी काय? ज्याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला, वाचा सविस्तर

Microsoft Update : आज मायक्रोसॉफ्ट विंडोज (Microsoft Windows) वापरणाऱ्या सिस्टमवर अचानक ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (Blue Screen of Death) एरर आल्याने एकच खळबळ उडाली. जगभरातील लाखो मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्सना याचा सामना करावा लागला आहे.

ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एररमुळे लाखो लोकांच्या सिस्टम अचानक बंद होत आहे. ज्याला क्राउडस्ट्राइक अपडेट कारणीभूत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल क्राउडस्ट्राइक म्हणजे काय? या लेखात जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

क्राउडस्ट्राइक म्हणजे काय?

क्राउडस्ट्राइक हे एक सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म असून हे प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्टसोबत काम करते. क्राउडस्ट्राइकचा मुख्य काम मायक्रोसॉफ्टचे कार्य व्यवसाय आणि वापरकर्त्यांना सुरक्षा उपाय प्रदान करणे आहे. क्राउडस्ट्राइकचे मुख्य उत्पादन Falcon आहे, जे नेटवर्क आणि एंडपॉइंट्सवर मेलिसियस फाइल्स आणि बिहेवियर शोधण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरते. Falcon च्या मदतीने सायबर हल्ले देखील शोधले जातात.

सुरुवात कशी झाली?

मायक्रोसॉफ्टच्या Buggy Update मुळे ही समस्या उद्भवल्याचे अहवालात कंपनीकडून म्हटले आहे. विंडोज सिस्टम आणि CrowdStrike च्या Falcon सेन्सरमध्ये समन्वयाच्या अभावामुळे हे सुरू झाले. क्राउडस्ट्राईकनेही हे मान्य केले आहे. तसेच क्राउडस्ट्राईककडून यावर काम देखील सुरु करण्यात आले आहे.

क्राउडस्ट्राइकने याबाबत म्हटले आहे की, कंपनीकडून यावर काम सुरु करण्यात आले आहे. कोणत्याही यूजर्सला तिकीट उघडण्याची गरज नाही आणि जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा कंपनीकडून सर्व यूजर्सना याबाबत अपडेट केले जाईल.

ब्लू स्क्रीन ऑफ डेथ किती धोकादायक

ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एक गंभीर एरर आहे. ज्याच्या परिणाम विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर दिसते. ब्लू स्क्रीन ऑफ डेथ जेव्हा सिस्टम क्रॅश होते तेव्हा दिसते. ज्यामुळे तुमची सिस्टिम अचानक बंद होऊ शकते आणि डेटा देखील गायब होऊ शकते.

BSNL मध्ये नेटवर्क पोर्टिंग करणार असाल तर ‘या’ पद्धतीने जाणून घ्या तुमच्या शहरात नेटवर्क आहे की नाही?

ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एररचा आज सर्वात जास्त परिणाम अमेरिकेतील विमानतळांवर दिसून आला. ज्यामुळे प्रवाशांना बोर्डिंग पासऐवजी हाताने लिहिलेल्या स्लिप देऊन फ्लाइटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube