Download App

हाताला काम नसणाऱ्या मुंडेंना बराशी खोदायला द्या; टोला लगावत जरांगेंचा अजितदादांना इशारा…

Manoj Jarange यांनी मुंडेंना टोला लगावत अजित पवारांना इशारा दिला आहे. मुंडे यांनी अजित पवारांकडे आपल्या हाताला देण्याची मागणी केली होती.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange on Dhananjay Munde and Ajit Pawar : एका कार्यक्रमामध्ये बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे आपल्या हाताला देण्याची मागणी केली. त्यावर जरांगे यांनी मुंडेंना टोला लगावत अजित पवारांना इशारा दिला आहे. हे प्रकरणं नेमकं काय? पाहूयात…

बॅगमध्ये रिव्हॉल्वर अन् काडतुसे राष्ट्रवादीचा नेता अडचणीत; पुणे विमानतळावर उघडकीस आला प्रकार

रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुंडे यांनी सुनील तटकरेंशी संवाद साधत अजित पवार यांना आपल्याला जबाबदारी दिली जावी अशी मागणी केली.

अखेर उत्सुकता संपली! ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘कांतारा: चैप्टर 1 ‘चा दमदार ट्रेलर प्रदर्शित!

काय म्हणाले मनोज जरांगे?

दरम्यान धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंडेंवर निशाणा साधला आहे. जरांगे म्हणाले मुंडेंना रोजगार हमीचे काम द्या. त्यांना बराशी खोदायला द्या फक्त मराठ्यांच्या नादाला लागू नका. अन्यथा अजित दादांना देखील सोडणार नाही. अजित दादांचा कार्यक्रम लावणार. असं म्हणत जरांगे यांनी मुंडेंना टोला लगावला आणि अजित पवारांना थेट इशारा दिला आहे.

हातात गुलाब, अन् पांढरी साडी; तेजस्विनी लोणारीची अदाकारी पाहिलीत का?…

काय म्हणाले धनंजय मुंडे?

रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, सुनील तटकरेंनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. चुकले तर कान धरावा. नाही चुकलं तर चालतं का? पण आता रिकामं ठेवू नका. काही तरी जबाबदारी द्या. अशी मागणी मुंडे यांनी केली होती.

follow us