Manoj Jarange on Maharashtra Government on Maratha reservation : सरकारला (Maharashtra Government) मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे. त्यामुळे आता 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घेतला जाणार. असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्य जरांगे उपोषण संपल्यानंतर रूग्णालयात उपचार घेत आहेत.
Olympics 2024 : रमिता जिंदालची दमदार कामगिरी; 20 वर्षांनी भारतीय महिला शूटरने गाठली अंतिम फेरी
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मी आता रूग्णालयातून सुट्टी घेऊन अंतरवालीकडे निघत आहे. त्यानंतर सगळ्या राज्यातील समाज एकत्र येऊन बैठक ठरवली जाणार आहे. ज्यामध्ये 29 तारखेला सरकारमधील आमदार पाडापाडीचा निर्णय घेतला जाणार आहे. कारण सरकार लक्ष देत नाही. ही चांगली गोष्ट आहे. गर्व हा संपतो गर्वाला कधी वाढ नसते. तर सरकारलां मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे.
Paris Olympics 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत कांस्यपदक
मात्र त्यांनी EWS आणि SEBC सुरू ठेवा. सरकारला जे काही करायचं आहे ते स्पष्टपणे करावं. अशाप्रकारे सरकारने जीवघेणा खेळ मुलांशी खेळू नये. मराठ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करून इकडे बोंबलत बसायचं. करायचं तर स्पष्ट करायचं शिका, निकष न लावता स्पष्ट द्यायचं शिका. असं म्हणत जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.