Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटे गावामध्ये उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी सांगितले आहे की, राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
जरांगे यांनी पुढं सांगितले आहे की, मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही, मला माझ्या जातीवर अन्याय मला सहन होणार नाही. जाणून बुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोट्या गुन्हे दाखल केल्या आहेत. जाणून बुजून प्रशासन सरकारच ऐकून आंदोलकांचा छळ करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी यावेळी केला. आता मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. असे आंदोलनाचे 6-7 टप्पे होणार आहेत. या एखाद्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सरकारला सुनावले आहे.
महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘इतक्या’ जणांना अटक? पोलीस महासंचालक म्हणाले…
राठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत होते.