Manoj Jarange Patil Meet Shivraj Divate : परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्यामुळं जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली होती. (Patil) या मारहाणी शिवराज दिवटे हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज रविवार रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे याच्या तब्येतीची विचारपूस केली.
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जरांगे गेले होते. याठिकाणी मराठा बांधावांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘परळीच्या कुत्र्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, अशा आक्रमक घोषणांनी परिसर रुग्णालयाचा दणाणून गेला होता. यानंतर मनोज जरांगे यांनी रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटेच्या प्रकृतीची विचारपूस केली. भेटीदरम्याना शिवराज दिवटे यांच्या कुटुंबीयाशीही जरांगे पाटील यांनी चर्चा केली. यावेळी मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेदेखील उपस्थित होते.
Video : संतोष देशमुखांचा दुसरा पार्ट होता-होता वाचला; आमदार धस परळी प्रकरणावर काय म्हणाले?
खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शिवराज दिवटे याची भेट घेतली होती. मनोज जरांगे यांनी शिवराज दिवटे याच्या प्रकृतीची विचारपूस करताना त्याच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवला. मनोज जरांगे पाटील हे शिवराजच्या तोंडापाशी कान नेऊन तो काय सांगतोय, हे सर्व ऐकून घेत होते. त्यांनी शिवराज दिवटेच्या अंगावरची चादर बाजूला करुन त्याच्या शरीरावरील मारहाणीचे वळही पाहिले. यावेळी त्यांनी शिवराजशी संवाद साधत तुझ्या पाठीशी आहोत, असा धीर देखील दिलाय. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
उद्या बीड बंदची हाक
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या (19मे) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ही बंदची हाक शांततेत होणार असून बीडच्या नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारण्याचा ठरवले आहे. असे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी ‘एबीपी माझा’ला सांगितले.