परळी हादरलं! तरुणाला लाठ्याकाठ्या अन् बेल्टने बेदम मारहाण; व्हिडिओही व्हायरल

Beed Crime : राज्यात बीड जिल्हा फक्त येथील गुन्हेगारी (Beed Crime) कृत्यांनीच चर्चेत राहत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून (Santosh Deshmukh Case) करण्यात आला होता. या प्रकरणाची देशात चर्चा झाली. यानंतरही जिल्ह्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आताही अशीच एक धक्कादायक घटना परळीत घडली आहे. येथील पेट्रोल पंपासमोरुन शुक्रवारी सायंकाळी एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. नंतर त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. घटना उघडकीस येताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परळीत रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून काही जणांनी शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला उचलले. नंतर त्याला गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन आले. येथे त्याला लाठ्याकाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिवराज दिवटे गंभीर जखमी झाला आहे. त्याला अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Beed Crime : लाथा मारून खाली पाडलं, मग दगडाने ठेचलं; माजलगावमध्ये भरदिवसा जीवघेण्या हल्ल्याचा थरार
परळीतील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरुन दहा ते बारा जणांच्या टोळक्याने आधी तरुणाचे अपहरण केले. नंतर त्याला निर्जनस्थळी नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मारहाण करणाऱ्या माथेफिरुंना लवकरात लवकर अटक करावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
एकूणच राज्यात बीड जिल्हा फक्त गुन्हेगारी घटनांनीच चर्चिला जात आहे. या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतलं आहे. पालकमंत्री होताच त्यांनी बीडमध्ये येऊन इशारा दिला होता. तसेच येथील ढासळलेली कायदा सुव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, येथे वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी कायदा सुव्यवस्थाच बीडमध्ये राहिलेली नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे.
बीड जिल्ह्यातली धक्कादायक घटना; कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, दहा पीडितांची सुटका