Download App

सरकार इंग्रजांपेक्षा बेकार, आम्ही आरक्षण घेणारच; मनोज जरांगे आक्रमक

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आजपासून (29 ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आजपासून (29 ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची सुरुवात केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) सुरु असणाऱ्या आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत महायुती सरकार (Mahayuti Government) इंग्रजांपेक्षा बेकार असल्याची टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता सरकारने असली डाव खेळावे आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे. सरकारला संधी आहे. गोर गरीब मराठाला आरक्षण द्या आम्ही तुम्हाला विसरणार नाही. असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच ओबीसीचे आरक्षण काढून आम्हाला द्या हे आम्ही कधीही बोललं नाही. ही लढाई आता शेवटची आहे. असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकार नाटक करत आहे. आंदोलनाला (Maratha Reservation) परवानगी द्याची की नाही हे सरकारच्या हातात आहे. सरकारने टॉयलेट आणि वॉशरुम बंद करुन ठेवले आहे. इथे कोणतीही व्यवस्था नाही. सरकार इंग्रजांपेक्षा बेक्कार झाले आहे. अशी टीका देखील जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर केली.

तर मुंबईत जर आम्हाला त्रास झाला तर आम्ही गावी गेल्यावर तुमच्या नेत्यांना त्रास देणार असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. तर  आमचे पोर माज आणि मस्ती घेऊन आले नाही ते मुंबईत वेदना घेऊन आले आहे असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईत मराठ्यांची संख्या वाढणार

तर पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मंगळवारपर्यंत अजून मराठे मुंबईकडे निघणार आहे. आरक्षणाला विलंब लागेल तसे तसे मराठा समाज मुंबईत येणार. मुंबईत कोपऱ्या कोपऱ्यात समाज दिसेल. आम्ही आरक्षण घेणारच. गोळ्या झेलणार पण आरक्षण घेणारच मी हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना घेतली.

शेख महंमद मंदीर समिती आणि दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला वाद अजित पवार यांच्यासमोर उफाळला..

तर दोन जातीमध्ये भांडण लावयची भूमिका सरकारची आहे. आम्ही कोणाचेही आरक्षण घेत नाही. आमचं आम्हाला घ्या अशी मागणी आम्ही करत आहोत असं स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

follow us