मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकले, मुंबईला धडकी भरवणारं भगवं वादळ; पोलिसांचाही बंदोबस्त

प्रशांत गोडसे, मुंबई
Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल (Manoj Jarange Patil) झाले असून त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याचा (Mumbai News) निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्या समजुतीसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी सातत्याने आंदोलन करत आहेत.
आझाद मैदानावर मराठा बांधवांची उपस्थिती वाढत असून परिसरात मोठी गर्दी जमलेली दिसत आहे. पोलिसांनी आझाद मैदानात स्वयंपाक करण्यास बंदी घातली असली तरी काही गाड्यांमधून स्वयंपाकाचे साहित्य मैदानाजवळ आणले गेले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपल्या समाजबांधवांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी झाले असून हळूहळू अधिक लोक आझाद मैदानावर पोहोचत आहेत.
आंदोलक मोठ्या प्रमाणात आल्याने पोलिसांची कुमक पडत असल्याचे दिसत आहे. परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. आझाद मैदान असो रस्ते फक्त भगव्या रंगाने फुलून गेले आहे. फक्त घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.
सरकारने गोळ्या घेतल्या तरी मागे हटणार नाही! आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटलांची गर्जना…
पोलीस बंदोबस्त :
2 अप्पर पोलीस आयुक्त
9 पोलीस उपायुक्त
29 सहायक पोलीस आयुक्त
99 पोलीस निरीक्षक
932 उपनिरीक्षक/सहायक उपनिरीक्षक
3929 पोलीस कर्मचारी
विशेष पथक :
13 राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) प्लॅटून
2 दंगल नियंत्रण पथके (क्यूआरटी)
10 दंगल नियंत्रण दले (डीएफसी)
700 होमगार्ड
आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईत मराठा बांधवांची गर्दी! जरांगेंच्या मागे जनसागर, पाहा PHOTO
पोलिसांची अट :
मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नियम आणि अटींसह आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, उपोषण केवळ 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच करता येणार आहे. त्यानंतर कुणालाही मैदानावर थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करत सरकारची चिंता वाढविली होती.आत मनोज जरांगे पाटील 6 वाजेनंतर काय भूमिका घेता याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.