Download App

….तरीही ‘हा’ लढा चालूच राहणार; अंतरवलीत घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर जरांगे काय म्हणाले?

घरावर ड्रोन कॅमेऱॅच्या फिरतीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिाय दिली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण?

Image Credit: Letsupp

Drone Camera on Manoj Jarange Home : अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून ड्रोन घिरट्या घातल असल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange )  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंतरवाली सराटी येथे ड्रोन फिरत आहेत. मी समाजासाठी आरक्षणाचा लढा लढतोय. ड्रोन फिरत असले तरी मी घाबरणार नाही. (Maratha Reservation) माझा लढा सुरूच राहील ,कोणाला काय साध्य करायचं आहे हे माहित नाही, (Drone Camera)मी घाबरुन माझा आरक्षण लढा व दौरा थांबवणार नाही अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी या ड्रोन प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आमचे देव हिंदू, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर केतकी चितळेची संतप्त पोस्ट व्हायरल

अंतरवाली सराटी ता. अंबड या गावात चार दिवसापासून आकाशात ड्रोन फिरत असल्याचं लक्षात आल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सरपंच कौशल्या तारख यांचे चिरंजीव पांडुरंग तारख व ग्रामस्थांनी गोंदी पोलीस स्टेशनला माहीती दिली आहे. मागील आठवड्यात सरपंच कौशल्याबाई तारख यांच्या घर परिसरात आणि गावात मध्यरात्री ड्रोन फिरलं. पुन्हा साडे नऊ ते दहा दरम्यान दोन ड्रोन फिरत असल्याचं लक्षात आलं. याच्या माध्यामतून मनोज जरांगे ,पांडुरंग तारख व सहकारी यांच्या घराची पाहणी करण्यात आली. एक कॅमेरा सरपंच राहत असलेल्या परिसरात तर दुसरा गावात फिरत असल्याचं नागरिक सांगत आहेत.

अंतरवाली सराटी हे गाव मराठा आंदोलनाचे केंद्र बनलेले आहे, गावात मनोज जरांगे हे सरपंच श्रीमती तारख यांच्या निवासस्थानी आणि उपोषण स्थळाजवळील लहुराव तारख यांच्या घरी मुक्कामी असतात. ड्रोनच्या घिरट्या गत आठवड्यापासून सुरू असल्याने आंदोलनामुळे ड्रोनच्या घिरट्या सुरू आहे का? दुसरं काही आहे का? किंवा जरांगे हे सहा जुलैपासून राज्यातील भागात दौरा करणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे का? असा संशय निर्माण केला जात आहे.

ये चलने वाली नहीं गिरने वाली सरकार है…अखिलेश यादव यांचा लोकसभेत भाजपवर घणाघात

नागरिकांमध्ये ड्रोनच्या घिरट्यांनी भितीचं वातावरण आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ड्रोनचं गुढ कायम असून ड्रोन नक्की कोण उडवतयं? त्यामागचा उद्देश कायं? याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी व सरपंच श्रीमती कौशल्या तारख यांचे चिरंजीव पांडुरंग वसंतराव तारख यांनी गोंदी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत तपास करणार असाल्याचं सांगितलं आहे.

follow us

वेब स्टोरीज