ये चलने वाली नहीं गिरने वाली सरकार है…अखिलेश यादव यांचा लोकसभेत भाजपवर घणाघात

ये चलने वाली नहीं गिरने वाली सरकार है…अखिलेश यादव यांचा लोकसभेत भाजपवर घणाघात

Parliament Session : ये चलने वाली नहीं गिरने वाली सरकार है असं म्हणत समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव यांनी एनडीए सरकारवर जोरदार हमला केला. ते लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरी आभार प्रस्तावर बोलत होते. (Akhilesh Yadav) दरम्यान, त्यांनी सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) जोरदार घणाघात केले. (Parliament Session) ते म्हणाले, तोडणाऱ्या सरकारचा पराभव झाला असून जोडणाऱ्या इंडियाचा विजय झाला आहे. तसंच, ‘400 पार’ घोषणा करणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं की मन की बात नाही तर जन कीबात चलेगी असा टोलाही अखिलेश यादव यांनी यावेळी लगावला.

जिथे सडक तिथं  विमानतळ बनवलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज PM मोदी बोलणार, विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देणार?

या निवडणुकीत पूर्ण ‘इंडिया’ला माहिती आहे की हा नैतिक इंडियाचा विजय आहे असं म्हणत अखिलेश यादव यांनी या निवडणुकीत सांप्रदायीक सराकरची कायचा पराभव झाला आहे असा घणाघातही केला. ज्या गंगेच्या ठिकाणी शपथ घेतली त्याचं ठिकाणी हे लोक खोट बोलत राहिले. ज्या मंदिराची भिंत उभा केली तिथंच पहिल्या पावसात पाणी गळायला लागलं. आम्ही जिथे सडक बनवली तिथं या लोकांनी विमानतळ बनवलं यांना कसं जनता माफ करणार सांगा असा प्रश्नही अखिलेश यादव यांनी यावेळी उपस्थित केला.

ईव्हीएम मशिनवर कधीच विश्वास ठेवणार नाही

आमच्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेत 80 जागा आल्या तरी आम्ही ईव्हीएम मशिनवर कधीच विश्वास ठेवणार नाही असं म्हणत अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मिशिनवर शंका उपस्थित केली. दरम्यान, त्यांनी अग्निवीर योजनेवरही भाष्य केलं. आज नाही तर उद्या आमचं सरकार येईल. त्यानंतर आम्ही ही अग्निवीर योजना लगेच बंदकरणार अशी मोठी घोषणाच त्यांनी यावेळी केली. तसंच, जोपर्यंत ही सरकार चालेल तोपर्यंत तोपर्यंत वंचित घटकांना काही मिळेल अशी आशा करतो असंही यावेळी अखिलेश यादव म्हणाले.

तरुणांच्या स्वप्नांना मारलं लिहून घ्या, इंडिया आघाडी गुजरातेत भाजपला हरवणार; राहुल गांधींचं मोदींना ओपन चॅलेंज

आमच्या उत्तर प्रदेशमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमिभाव देण्याचं वचन दिलं होत परंतु, एक रुपयाही दिला नाही असं म्हणत यांनी आश्वासन काय दिलं होत हेही यांच्या लक्षात नाही असा टोला अखिलेश यादव यांनी यावेळी लगावला. तसंच, त्यांनी यावेळी नीट पेपर लीक प्रकरणावरूनही सरकारला चांगलचं घेरलं. ते म्हणाले, हे सरकार तरुणांना रोजगार देऊ इच्छित नाही त्यामुळे पेरपर लीक करतात असा थेट आरोप अखिलेश यादव यांनी यावेळी केला. तसच, सरकारने तरुणांच्या स्वप्नांना मारलं आहे असंही ते यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube