Download App

CM शिंदेंच्या हस्ते ‘अध्यादेश’ स्वीकारत जरांगेंनी उधळला ‘गुलाल’ : ज्यूस पिऊन उपोषणही मागे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार असा ‘अध्यादेश’ स्वीकारत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुलाल उधळला आहे. यानंतर शिंदे यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याची घोषणाही जरांगे पाटलांनी केली. आता आजापासूनच सर्व समाज नवी मुंबईतून मागे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Manoj Jarange Patil has announced that he is withdrawing his fast by drinking juice.)

अध्यादेश टिकवा : जरांगेंची मुख्यमंंत्र्यांना विनंती

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, हा अध्यादेश काढला असला आणि मराठा समाजाने गुलाल उधळला असला तरीही त्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. हा अध्यादेश आता कायमस्वरुपी टिकायला हवा. त्यासाठी सहा महिन्यांच्या आत तो विधिमंडळात कायदा म्हणून मंजूर करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तो न्यायालयातही टिकणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

…तर पुन्हा आझाद मैदानावर धडकलोच म्हणून समजा; विजयी सभेत जरांगेंनी पुन्हा दिला इशारा

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकारने मोठा संघर्ष केला. आरक्षणासाठी अखेर आम्हाला मुंबईची वाट धरावी लागली. मराठे इतक्या ताकदीने मुंबईत आले की सरकारला आमच्या मागण्या मान्य करून अध्यादेश काढावा लागला. मराठा समाजाच्या ताकदीमुळेच अध्यादेश निघाले आहेत. अन्यथा आदेश निघाले नसते. आंदोलन संपलेले नाही तर सध्या आंदोलन स्थगित करत आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.

‘मी आज शपथ पूर्ण केली, निर्णयांची अंमलबजावणीही होणार’; CM शिंदेंकडून जरांगेंचं कौतुक

मराठा समाज मुंबईकडे निघाला तसे अध्यादेश निघत गेले. हा मराठा समाजाचा विजय आहे. गुन्हे मागे घेण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. सगेसोयरे यांच्याबाबतही अध्यादेश काढण्यात आला आहे. सात ते आठ अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही समाधानी आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले. यानंतर आता आजच नवी मुंबईतून सर्व जण मागे फिरणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

follow us