Download App

आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील; सत्ता मराठ्यांचीच येणार, जरांगे पाटील पुन्हा गरजले

विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचं नाही.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची सत्ता येणार आहे. (Manoj Jarange) या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचं नाही. मात्र, सरकारने आता आरक्षण न दिल्यास दुसरा पर्याय नाही. आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते माध्यामांशी बोलत होते.

शेख हसीनांच्या राजवटीचा अंत! कोण आहे नाहिद इस्लाम?, बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच चेहरा

हे षडयंत्र

सध्या मराठा समाजाचं आंदोलन सुरू नाही. समाजाने संयम धरला पाहिजे. सध्या काही लोकांकडून समाजाला उचकवण्याचे काम सुरू आहे. सर्वजण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले आहेत. मग ते भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते असो किंवा भाजपचे मराठा आमदार, हे सर्व षडयंत्र आहे. आंदोलन करायला लावण्यासाठी हे एक षडयंत्र आहे’, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

सत्तापालट होणार

कारण नसताना वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणी काहीही बोललं तरी समाजाने आंदोलन करण्याची गरज नाही. ज्या दिवशी जाब विचारायचा असं वाटेल त्या दिवशी सामाज काय करतो हे बघा असं म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. तसंच, येणाऱ्या विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे असंही ते म्हणाले आहेत.

पायाखाली तुडवायची वेळ

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यातील मराठा आमदारांची बैठक झाल्याचं बोललं जात आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, ‘सगळ्याच पक्षातील मराठ्यांच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगवं. आम्हाला राजकारणात जायचं नाही. त्यात आम्हाला ढकलू नका. ही सरकारला शेवटची संधी आहे. कारण आरक्षण देण्याचे केंद्र सत्ता असते. सध्या सत्ता त्यांची आहे. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आमच्याकडं दुसरा पर्याय नाही. 29 तारखेला याबाबत निर्णय होईल. मराठा समाजाला हीच राजकारणाला पायाखाली तुडवायची योग्य वेळ आहे असं वाटलं तर निर्णय होईलच. कारण आमचाही नाईलाज असेल’, असे जरांगे म्हणाले.

बांगलादोशातून शेख हसीना भारतात; प्रवेशापूर्वी 2 राफेल होते अलर्टवर, कसा ठरला हिंडन एअरबेसचा मार्ग?

समाजाचं कल्याण

यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला ताकदीने एकत्र येण्याचं आवाहन देखील केले आहे. ते म्हणाले, सध्या चारही बाजूने सरकारने आणि सत्ताधारी भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांनी मला उघडं पाडण्याचा प्रयत्न केल्याचं समाजाच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांतील समाज ताकदीने एकत्र झाला आहे. आता रॅलीतून सरकारला समाजाची ताकद दिसणार आहे. मराठा समाजाला आवाहन आहे सर्वांनी एक दिवस प्रत्येक जिल्ह्यातील रॅलीत सहभागी व्हा, एक दिवस दिला तर समाजाचे कल्याण होणार आहे. ज्या ज्या जिल्ह्यांत या रॅली आहेत तिथे सर्व मराठा समाजाने एकजुटीने यायचे आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

follow us