Download App

मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा कट, आंदोलनात समाजकंटकांची घुसखोरी; सकल मराठा समाजाचा आरोप

Manoj Jarange Patil Maratha Reservation protest Mumbai : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मराठी आंदोलक सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून काही आंदोलकांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आंदोलनाच्या सुरूवातीपासुनच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. मात्र सकल मराठा समाजाकडून (Sakal Maratha Samaj) आता या हुल्लडबाजीच्या प्रकाराबद्दल गंभीर आरोप करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाला धक्का! धडाकेबाज गोलंदाज मिचेल स्टार्कची टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती

आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा आरोप

सकल मराठा समाजाकडून (Sakal Maratha Samaj) मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनात घुसून हुल्लडबाजी करत मराठा समाजाचे आंदोलन बदनाम केले जात असल्याचा दावा सकल मराठा समाजाने केला आहे. राज्यपालांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता सकल मराठा समाजाकडून करण्यातआली आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधी या पार्श्वभूमीवर, लवकरच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीच्या मागणीचे निवेदन सादर करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळत आहेत, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप…

मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस

मुंबई पोलिसांनी नियमभंग आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. मैदान तातडीने रिकामं करण्याचा आदेश दिला आहे. मुंबईत सुरू असलेलं मराठा आंदोलन हाताबाहेर जात असल्याने, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज 2 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे, शहराचे छावणीसदृश झालेले वातावरण, यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढा, असे कोर्टाने म्हटले आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.

बीडमधील धक्कादायक घटना! बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंची गळफास घेऊन आत्महत्या

गोळ्या घातल्या तरी…
याच दरम्यान, जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आपली ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट करताना म्हटलं होतं की, “फडणवीस यांनी गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षणाशिवाय जाणार नाही.” या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलकांचा उत्साह वाढला होता. पण आता मुंबई पोलिसांची नोटीस आल्यानंतर वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.

follow us