Manoj Jarange Patil : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मनोज जरांगे पाटील यांनी आज भेट घेतली. देशमुखांच्या हत्येनंतर जरांगे पाटील हे अनेकदा मस्साजोगला जाताना दिसले. (Jarange) त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीये. काही दिवसांपूर्वीच जरांगे यांनी मोठा खुलासा करत म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे हे माझ्या भेटीला आले होते आणि त्यावेळी त्यांच्यासोबत वाल्मिक कराड होता. निवडणुकीच्या वेळी अनेक लोक माझ्या भेटीला येत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले.
आता नुकताच जरांगे यांनी मोठा दावा केलाय. सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत होणार हे थेट त्यांनी सांगितले. फक्त हेच नाही तर त्यांनी तारीखही सांगून टाकली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 25 फेब्रुवारी येत्या मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस हे सगे- सोयऱ्यांचा निर्णय घेतील. सात करोड मराठा डोळे लावून बसले आहेत. शिंदे समिती त्यांनी सुरू केली. येत्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय मंजूर शंभर टक्के होणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार असल्याचे जरांगे म्हणाले.
मुंडे पैसा, पद अन् राजकारणाला हापापलेले तर त्यांना भेटणारे धस विश्वासघातकी; जरांगेंचा हल्लाबोल
यावेळी जरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना देखील दिसले. जरांगे म्हणाले की, पदाला चिटकून बसलेला आहे. लालची माणसांना जनतेचे देणे घेणे नाही किंवा जातीचेही नाही. जनतेने तुम्हाला तिथे बसवले आहे आणि जनता तुमचा राजीनामा मागत असेल तर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांना फक्त पैसा आणि पद लागते. लोकांना वेड्यात काढले तर न्याय नाही, मिळणार. ना संतोष देशमुखला ना सोमनाथ सूर्यवंशीला.
पोलिसांवर आणि तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना देखील जरांगे पाटील हे दिसले. आरोपींच्या संपत्ती जमा अजूनही केल्या गेल्या नसल्याचे जरांगे यांनी म्हटले. सुप्रिया सुळे यांनी देखील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मी संतोष देशमुखांना न्याय मिळून देण्यासाठी लढणार असल्याचे सांगतानाही सुप्रिया सुळे या दिसल्या. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलिसांवर काही गंभीर आरोप केले आहेत.