मुंडे पैसा, पद अन् राजकारणाला हापापलेले तर त्यांना भेटणारे धस विश्वासघातकी; जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Criticize Dhananjay Munde and Suresh Dhas : मनोज जरांगे पाटील हे परभणी दौऱ्यावर आले होते. परभणी येथील पाथरी रोडवर असलेल्या जीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सुरेश धस यांच्यावर टीका केली.
अजित पवार आता तरी डोळे उघडा, अभिजीत पवारांच्या घरवापसीवरून जितेंद्र आव्हाडांची टीका
जरांगे म्हणाल की, धनंजय मुंडे यांना जनतेने मंत्री केलं आहे. जर जनतेला वाटत असेल की, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. तर त्याने द्यायला पाहिजे होता. पण धनंजय मुंडे हा पैसा पद आणि राजकारणाला हापापलेला माणूस आहे. तो माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर राजकारण करतो. आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर पदांचा राजीनामा दिला आहे. पण हा माणूस एवढा हापापल्याला आहे की, त्याला सत्तेतील खुर्ची सुटत नाही.
मोहम्मद शमी आयसीसी स्पर्धेचा नवा ‘सुलतान’, झहीर खानचा मोडला खास विक्रम
त्याचबरोबर धस यांच्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, आमदार सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाने प्रचंड विश्वास टाकला होता. कधी नव्हे तो एका मराठा लोकप्रतिनिधीवर राज्यातला मराठा समाज प्रचंड प्रेम करीत होता. मी देखील सुरेश धस यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला. पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची वार्ता कळल्यानंतर मात्र आमचा विश्वास त्यांच्यावरला उडून गेला आहे.
आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला पाहिजे नव्हती. जरी त्यांच्यावर पक्षाने दबाव टाकला असला तरी सुरेश धस यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजासमोर उभे राहिले असते. तर मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. आणि पुन्हा एकदा त्यांना दोन लाख मताच्या फरकांनी विजयी देखील केले असते. पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मराठा समाजाचा तर विश्वासघात केलाच पण माझा देखील त्यांच्यावरला विश्वास उडाला आहे.