अजित पवार आता तरी डोळे उघडा, अभिजीत पवारांच्या घरवापसीवरून जितेंद्र आव्हाडांची टीका

Jitendra Awhad Criticize Ajit Pawar on Abhijit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांनी अजित पवार यांच्या गटांमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर लगेचच दोन दिवसांत त्यांनी पुन्हा माघार घेतली. त्यावर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अभिजीत पवार यांच्या पक्षप्रवेशामागील कारणं आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आणखी अनेक कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं सांगितलं.
मोहम्मद शमी आयसीसी स्पर्धेचा नवा ‘सुलतान’, झहीर खानचा मोडला खास विक्रम
यावेळी बोलताना अव्हाड म्हणाले की, अभिजीत पवार मला पहिल्यांदाच घाबरलेला दिसला. त्याच्या बाबतीत जे झालं ते वाईट झालं. अशाच प्रकारे आमच्या पक्षाचा मुंब्रातील अध्यक्ष शमीन खानलाही गेल्या वर्षभर असाच त्रास दिला जातोय. आयकर अधिकाऱ्यांची फोन येतात. दुबईवरून धमक्या येतात. त्यात जमील शेखचा खून झाला आहे. तर शमीन खान देखील आत्महत्येकडे वळाला होता. त्यामुळे राज्यात हे असे प्रकार कधी थांबणार आहे? असं सवाल त्यांनी विचारला.
अजित पवारांवर माझा विश्वास नाही, ते धनंजय मुंडेंना वाचवत आहेत…; करुणा मुंडेंचा आरोप
त्याचबरोबर या सर्व प्रकारासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना सांगणार आहे. नुकतेच ते म्हटले होते की, विरोधकांकडून संवाद कमी होतोय. मात्र आम्ही अशा वातावरणामुळे बोलायला घाबरतो. तसेच अजित पवार यांना मला अडकवायचे आहे. मात्र मी कुठल्याही गुन्ह्यांमध्ये सापडत नाही. तसेच माझे संपत्तीची खोली चौकशी करा. असा थेट आव्हान देखील यावेळी त्यांनी केले. तसेच यावेळी अजित पवारांवर बोलताना आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांनी आता तरी डोळे उघडावेत. लोकांना घाबरून धमकावून स्वतःच्या गटात घेण्याचं घाणेरड राजकारण ठाणे शहरात केले जात आहे. असंही आव्हाड म्हणाले.