मोहम्मद शमी आयसीसी स्पर्धेचा नवा ‘सुलतान’, झहीर खानचा मोडला खास विक्रम

  • Written By: Published:
मोहम्मद शमी आयसीसी स्पर्धेचा नवा ‘सुलतान’, झहीर खानचा मोडला खास विक्रम

Mohammed Shami Record : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये मोहम्मद शमीने (Mohammed Shami) बांगलादेशविरुद्ध 5 विकेट (IndvsBan) घेत इतिहास रचला आहे. शमी एकदिवसीय सामन्यांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने झहीर खानला (Zaheer Khan) मागे टाकले आहे.

शमी मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने झहीर खानला मागे टाकले, झहीरने 44 सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या होत्या. पण आता शमीने 33 सामन्यांमध्ये 74 विकेट्स घेत एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. याशिवाय, मोहम्मद शमी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा जगातील दुसरा खेळाडू बनला आहे. तथापि, गोलंदाजीच्या बाबतीत शमीने मिशेल स्टार्कला मागे टाकले आहे.

आयसीसी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून मोहम्मद शमी 33 सामन्यात 74 विकेट्स घेतल्या आहे तर झहीर खानने 44 सामन्यात 71 विकेट्स, जसप्रीत बुमराहने 43 सामन्यात 68  विकेट्स, रवींद्र जडेजाने 62 सामन्यात 65 आणि रविचंद्रन अश्विनने 43 सामन्यात 59 विकेट्स घेतल्या आहे.

बांगलादेशविरुद्ध सुरु असणाऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. तौहीद हृदयॉयने शानदार शतक झळकावले तर भारताकडूनमोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतले.

अंजली दमनिया यांना गोपनीय कागदपत्र मिळतात कशी? : राष्ट्रवादीचा सवाल

या सामन्याची सुरुवात बांगलादेशसाठी चांगली झाली नाही. 40 धावा पूर्ण होण्यापूर्वीच 5 विकेट पडल्या. यानंतर, झाकीर अली आणि तौहीद हृदयॉय यांच्यात सुमारे 150 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे सामन्यात उत्साह निर्माण झाला. या सामन्यात शमीने 5, हर्षित राणा यांनी 3 आणि अक्षर पटेल यांनी 2 विकेट घेतल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube