कंगना रनौतला मोठा झटका, बांगलादेशात ‘इमर्जन्सी’वर बंदी; जाणून घ्या कारण…
Emergency Film in Bangladesh : गेल्या वर्षभर रखडलेला
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘इमर्जन्सी’ चित्रपट (Emergency Film) लवकरच प्रदर्शित होतोय. मात्र, आता या चित्रपटावर बांगलादेशमध्ये (Bangladesh) बंदी घालण्यात आलीये.
जयंत पाटलांना लवकरच धक्का! ‘शेकाप’ नेत्याला भाजपाचे वेध; पडद्यामागं काय घडतंय?
कंगनाचा हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच हा चित्रपट वादात सापडला होता. या सिनेमात शीख समुदाय, तसेच ऐतिहासिक गोष्टींचे चूकीचं चित्रण करण्यात आलं आहे, असा आक्षेप शिरोमणी अकाली दलासह अनेक शीख संघटनांनी घेतला होता, त्यामुळं सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र दिलं नव्हतं.
केजरीवालांचा पाय खोलात! मनी लाँड्रिंगचा खटला चालणार; ईडीला गृह मंत्रालयाकडून मंजुरी
दरम्यान, अखेर सिनेमातल्या काही दृश्यांवर कात्री लावल्यानंतर न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. हा चित्रपट १७ जानेवारी २०२४ रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. पण आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या फक्त दोन दिवस आधी बांगलादेशात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. यामागील मुख्य कारण भारत आणि बांगलादेशमधील सध्याचे तणावपूर्ण राजकीय संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट भारतात लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात बांगलादेशला स्वातंत्र्य कसे मिळाले हे देखील दाखवण्यात आलं. इंदिरा गांधींचे बांगलादेशला स्वातंत्र्या मिळणून देण्यासाठी खूप मोठा वाटा आहे. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात भारतीय सैन्य आणि इंदिरा गांधी सरकारनं महत्वाची भूमिका बजावली होती हे देखील या चित्रपटात दाखवण्यात आलं. याशिवाय, बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रहमान यांना मिळालेल्या पाठिंब्याचे चित्रण यात केलंय. या चित्रपटात बांगलादेशातील अतिरेक्यांनी शेख मुजीबुर रहमान यांची हत्या केल्याची घटनाही दाखवण्यात आली, जी बंदीच्या निर्णयामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.
दरम्यान, या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली. तिने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे यांच्याही मध्यवर्ती भूमिका आहेत.