भारताची धमाकेदार सुरुवात, शामी, गिल चमकले, बांग्लादेशचा 6 विकेटने पराभव

  • Written By: Published:
भारताची धमाकेदार सुरुवात, शामी, गिल चमकले, बांग्लादेशचा 6 विकेटने पराभव

Champions Trophy 2025 : भारताने बांगलादेशचा पराभव करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची (Champions Trophy 2025) सुरुवात केली आहे. बांगलादेश विरुद्ध झालेल्या (IndvsBan) सामन्यात भारतीय संघाने 6 विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

भारताकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने (Shubman Gill) शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने एकदिवसीय सामन्यांत 8 वे शतक पुर्ण केले तर गोलंदाजीत मोहम्मद शामीने (Mohammed Shami) 5 विकेट घेत इतिहास रचला आहे. शामी आता एकदिवसीय सामन्यांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. या विजयासह भारतीय संघ ग्रुप अ मध्ये टॉप 2 मध्ये आहे. तर पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आता भारताचा पुढील सामना 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता मात्र बांगलादेशाची सुरुवात खूपच खराब झाली. बांगलादेशच्या अवघ्या 35 धावांत 5 विकेट पडल्या होत्या मात्र त्यानंतर झाकीर अली आणि तौहीद हृदयॉयने 154 धावांची भागीदारी करून बांगलादेशला सामन्यात परत आणले. बांगलादेश संघाने 49.4 षटकांत सर्व विकेट गमावून 228 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणा यांनी तीन आणि अक्षर पटेलने दोन विकेट घेतले.

महायुतीमध्ये लवकरच राजकीय भूकंप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मोठा दावा

तर दुसरीकडे 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारताला धमाकेदार सुरुवात दिली. रोहित शर्मा 36 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली दरम्यान भागिदारी झाली. विराट कोहली 22 धावा करून बाद झाला तर श्रेयस अय्यर (15) आणि अक्षर पटेल (8) वर बाद झाला. यानंतर केएल राहुलसोबतच्या शुभमनने भागिदारी करत भारताला विजय मिळून दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube