महायुतीमध्ये लवकरच राजकीय भूकंप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मोठा दावा

Harshvardhan Sapkal : महायुतीमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी लेटस्अप मराठीशी ( Letsupp Marathi) बोलताना केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल करत भाजपला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत. असा गंभीर आरोप देखील केला आहे.
लेटस्अप मराठीशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुतीचं सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा असं आहे. तिन्ही पक्ष विचार बाजूला ठेवून फक्त सत्ता घेऊन चालत आहे. सध्याचा राजकारण पाहता लवकरच महायुतीमध्ये मोठा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. असं लेटस्अप मराठीशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. त्यांच्याकडे 238 आमदार असल्याने सर्वकाही ठीक चाललं पाहिजे होते मात्र ते होताना दिसत नाही. पीएवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माजी मुख्यमंत्री आहे आणि आता उपमुख्यमंत्री आहे हे त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या ध्यानात येत नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. सरकार त्यांना चालवायचं आहे पण मी देखील महाराष्ट्राचा नागरिक असल्याने ते माझे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे असेही ते म्हणाले. तसेच लवकरच महायुतीमध्ये मोठा अपघात पाहायला मिळेल. असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
मोहम्मद शमी आयसीसी स्पर्धेचा नवा ‘सुलतान’, झहीर खानचा मोडला खास विक्रम
याचबरोबर भाजपला महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक होऊ द्यायच्या नाहीत. असा गंभीर आरोप देखील यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तर भाजपवर हल्लाबोल करत इंग्रजांनी जाताजाता ‘डिव्हाइड अँड रुल्स’ चं हत्यार भाजपकडे देऊन गेले आहे आणि यांनी हे संपूर्ण राज्यात पसरविले. त्यामुळेच राज्यात मराठा – ओबीसी राजकारण होत आहे असेही ते म्हणाले.