Download App

जरांगे मोठा लढा उभारण्याच्या तयारीत; म्हणाले, आरक्षण असताना ‘ओबीसी’ लढत असतील तर आम्ही…

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण असताना ओबीसी इतक लढत असतील तर मराठ्यांनी किती लढायला पाहिजे असं म्हणत नव्या लढाईचा इशाराच दिला आहे.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : ओबीसींना आरक्षण असताना ते एवढं लढत आहेत. (Manoj Jarange) मग आम्हाला आरक्षण नसताना किती लढायला पाहिजे? असा प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी आता उरले-सुरले मराठे एकत्र येऊन मोठा लढा उभा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Hake) ते पत्रकाराशी बोलत होते.

उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसायच का?  तर आम्ही लगेच उपोषण सोडणार;लेटस्अप मराठी शी बोलताना लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा

माझ्या मराठ्यांना आज आरक्षणच नाही. त्यामुळे आता खानदानी मराठा आपसातले सगळे मतभेद विसरून रस्त्यावर उतरणार आहे असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी यावेळी दिला आहे. हे आरक्षण असताना आम्हाला मिळू नये म्हणून लढत असतील तर आम्हाला मोठा लढा उभारावा लागेल. कारण आम्ही काय फक्त उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसायच का?” असा प्रश्नही जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

मराठा नेत्यांना इशारा

मराठा नेत्यांनी इकडं लक्ष द्या नाहीतर विधानसभेत एकालाही मदत करणार नाही. मराठा आंदोलकांच्या पाठीशी उभं राहा नाहीतर तुमच्या दारात येणं बंद करु, सर्व आमदारांनी समाजाच्या पाठीशी उभं राहायला हवं, ओबीसी आमदारांनाही आम्ही मतदान करतो. आवाज उठवणं आमदाराचं काम आहे अन्यथा मराठा दारात उभा करू देणार नाही. अधिवेशनात मुद्दा मांडा. कोण पत्र द्यायला येत नाही याकडे मराठा लक्ष देत आहोत, असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.

तर आम्ही स्वस्त बसणार नाही समता  च्या दबावातून भुजबळांचं प्रेशर पॉलिटिक्स; मंत्रिपदाचा राजीनामा की नुसतीच पोकळ हवा? 

सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण 13 तारीख दिली आहे. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आरक्षण हवं हे दहा महिन्यापासून म्हणत आहोत. 13 जुलैच्या आधी सर्व दाखल गुन्हे मागे घ्यायला हवेत. आठ ते नऊ विषय आम्ही शंभूराजे यांना सांगितले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माहित विषय आहे, १३ जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे. त्याचबरोबर या लढ्यात मराठा आमदारांनी लक्ष नाही दिलं तर एक एका आमदाराला उघड पाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत.

follow us