Manoj Jarange Patil on Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांनी आज विधानपरिषदेची उमेदवारी (Vidhanparishad Electon) दिली. विधानपरिषदेवर घेतल्यानंतर त्यांना मंत्रिपदही दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
शेतकऱ्यांनो, गुड न्यूज! जुलैमध्ये धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे विजयी यांनी पराभव केला होता. जरांगे फॅक्टरमुळेच सोनवणेंचा विजय झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. याविषयी आज माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, या निर्णयाला चुकीचा निर्णय म्हणण्याचे कारण नाही आणि चांगला निर्णय म्हणण्याची आवश्यकता नाही. या निर्णयावर आम्ही नाराज होण्याचं कारण नाही. आम्ही त्यावर कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही. कारण आम्ही जातीयवादी नाही. आम्ही निवडणुकीत त्यांना पाडा असंही म्हणालो नव्हतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा आमच्या समाजावर काहीही परिणाम होण्याचं कारण नाही, असं जरांगे म्हणाले.
पुढं बोलतांना ते म्हणाले की, आम्ही एक समाज म्हणून एकत्र आहोत आणि एकजुटीने राहू. एकजुटीने आम्ही आरक्षणसाठी लढा देणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आहोत, असंही जरांगे म्हणाले.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला की, भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयाचे तुम्ही स्वागत करणार का? त्यावर जरांगे म्हणाले, या निर्णयाचे स्वागत करणारा मी कोण आहे? मी स्वागत केल्यानं किंवा न केल्यानं त्यांना काही पडणार आहे का? जर त्यांनी फरक पडणार असेल तर मी कौतुक करेन, असं जरांगे म्हणाले.