विरोधी पक्षनेत्याने मला शिवीगाळ केली, लाड यांच्या आरोपावर दानवेंच प्रत्युत्तर, ‘बोट दाखवणाऱ्याचे बोटं…’

विरोधी पक्षनेत्याने मला शिवीगाळ केली, लाड यांच्या आरोपावर दानवेंच प्रत्युत्तर, ‘बोट दाखवणाऱ्याचे बोटं…’

Ambadas Danve : लोकसभेत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) हिंदू धर्मांवरून केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यातील विधानपरिषदेत उमटलेत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) आणि भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात जोरदार खडांजगी झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लाड यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले. दानवे यांनी आपल्याशी गैरव्यवहार करत मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, असा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

… तर अन्सारी कुटुंबाचा जीव वाचला असता, ‘ती’ चूक पडली महाग; भुशीडॅम दुर्घटनेत मोठी अपडेट 

लाड यांनी आज विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले. लाड म्हणाले, राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलतांना हिंदुत्वासंदर्भात जे विधान केलं आहे. त्यावर विधानपरिषदेत बोलताना मी राहुल गांधींच्या निषेधाच ठराव मांडत तो लोकसभेत पाठवावा. तसेच त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी केली. त्यावर अंबादास दानवे हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले, तेव्हाही मी भाषण करत होता. त्यावेळी अंबादास दानवेंनी माझ्याशी गैरव्यवहार करण्यास सुरूवात केली, असं लाड म्हणाले.

आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवणार ‘बाबू’; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

दानवेंनी मला आई आणि बहिणीवरून शिवीगाळ केली, असा आरोपही लाड यांनी केला. तसेच अंबादास दानवे यांनी हिंदूंचा अपमान केला असून त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलतांना केलेल्या आरोपावर आता अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेत बोलताना माझा तोल सुटला नाही. मी एक शिवसैनिक आहे. माझ्याकडे बोट दाखवणाऱ्याचे बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे. ज्या विषयाचा सभागृहाशी संबंध नाही, त्याविषयावर माझ्याकडे हातवारे करून ते बोलत होते, असं अंबादास दानवे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज