मोदींचा निसटता विजय, ते अयोध्येतून लढले असते तर पराभूत झाले असते; राहुल गांधींनी डिवचलं
Rahul Gandhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर आज लोकसभेत चर्चा सुरू झाली. या निमित्ताने विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आज पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी बोलतांना त्यांनी अयोध्येचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. भाजप हिंसा पसरवत असून पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणुकीत उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते, असा टोला राहुल गांधींनी लगावला.
संभागृत बोलताना राहुल गांधी म्हणाले, भाजपने राम मंदिराचे उद्घाटन केले. मी अवधेश प्रसाद यांना विचारले की, तुम्हाला कधी वाटलं की, तुम्ही अयोध्येत जिंकू शकतात. ते म्हणाले, मला पहिल्यापासून माहित होते की, मीच जिंकणार. अयोध्येत विमानतळ बनवण्यासाठी अयोध्यावासियांची जमीन हिसकावली गेली. आजपर्यंत त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. अयोध्येत छोटे दुकानदार, छोट्या इमारती पाडण्यात आल्या. त्यांना रस्त्यावर आणण्यात आले. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी उद्योगपती अदानी, अंबानी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अयोध्यामधील कुणीही नव्हते, असं राहुल गांधी म्हणाले.
मोठी बातमी : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांचा कारावास; दिल्ली HC ने सुनावली शिक्षा
ते म्हणाले, मोदींनी अयोध्येतील जनतेच्या मनात भीती निर्माण केली. त्यांची जमीन हिसकावून घेतली. त्यानंतर सामान्य अयोध्यावासियांना मंदिर उद्घाटनावेळी दूर ठेवले. त्यामुळेच अयोध्येतील जनतेने निवडणुकीत याचा वचपा काढला. याशिवाय नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून निवडणूक लढण्यापूर्वी दोनदा सर्वे केला. दोन्ही वेळा सर्वे करणाऱ्यांनी त्यांना अयोध्येतून निवडणूक लढवण्यास विरोध केला. जर ते तिथून लढले असते तर त्यांचा पराभव झाला असता. म्हणून पंतप्रधान वाराणसीत गेले आणि त्यांचा तिथे निसटता विजय झाला, अशा शब्दात राहुल गांधींनी डिवचलं.
राहुल गांधींनी माफी मागावी- शाह
सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत. भाजप हिंसा पसरवत आहे, अशी टीका राहुल गांधीनी केल्यानं सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. राहुल गांधींच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेत सर्व हिंदूंना हिंसक म्हणणं चुकीचे आहे, असं म्हटलं. तर गृहमंत्री शाह यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. राहुल गांधींचे विधान आक्षेपार्ह आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी शाह यांनी केली