Download App

…तर बीड जिल्हा कडेकोट बंद असेल; महादेव मुंडेंच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर जरांगेंचा सरकारला इशारा

रळीतील महादेव मुंडे यांच्या खुनाला १८ महिने झाले तरी आरोपी अटक झालेले नाहीत. आज मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil Meet Mahadev Munde Wife : परळीतील महादेव मुंडे यांच्या खुनाला १८ महिने झाले तरी आरोपी अटक झालेले नाहीत. काही दिवसांपूर्वी येथीलच बाळा बांगर यांनी स्पष्टपणे वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचं नाव घेत आरोप केले. तरीही पोलीस काहीच करीत नव्हते. त्यामुळे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषारी (Patil) रसायन प्राशन करुन जीव देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आज मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली.

यावेळी जरांगे पाटील यांनी जिल्हा बंदचा इशारा दिला आहे. जर २५ तारखेपर्यंत सरकारने एसआयटी, सीआयडी नेमली नाही तर जिल्हा कडेकोट बंद असेल, असा इशारा त्यांनी दिला. ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ दीपक मुंडे यांनी जरांगेंना माहिती देताना सांगितलं की, सुरुवातीला पोलिसांनी १५० मोबाईल नंबर तपासले होते. त्याले ६ मोबाईल नंबर त्यांना निष्पन्न होते. म्हणजे पोलिसांना नेमके आरोपी माहिती आहेत. परंतु, पुढे काहीच झालं नाही असंही ते म्हणा्ले.

छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यावरील हल्ला सुनील तटकरेंनीच; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

यावेळी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, तत्कालीन एसपी ठाकूर यांचेही सीडीआर तपासले पाहिजेत. त्यांना कुणाचे फोन आले, हे स्पष्ट झालं पाहिजे. एसपी ठाकूर यांच्यासह पीआय सानप यांचा सीडीआर काढण्याची गरज आहे. कारण त्यांनाही कुणाचे फोन आले होते, हे पुढे आलं पाहिजे. मीडियात चर्चा झाली की चार दिवस तपास सुरु होतो, पुन्हा जसाश तशी परिस्थिती निर्माण होते. मुख्यमंत्र्यांना भेटून आरोपी अटक करण्याची मागणी करणार आहे.

चोरमले साहेब म्हणाले होते, बंगल्यावरुन फोन आल्यामुळे तपास थांबला. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. महादेव मुंडेला न्याय द्यायचा म्हणून कोणत्याही नेत्याचा शब्द नाही. आता जितेंद्र आव्हाड बोलले म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ पाहिजे. त्यांना भेटून याची सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे आवाहन करतो की, मुंडे कुटुंबियांची एसआयटी आणि सीआयडीची मागणी मान्य करा.

२५ तारखेपर्यंत पाऊल उचललं नाही तर जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन करावं लागणार आहे. जर महावेद मुंडेंना न्याय मिळाला नाही तर जिल्हा कडक बंद राहील. ‘मुख्यमंत्र्यांनी आमचा अंत बघू नये, मी जर या मॅटरमध्ये घुसले तर मी काय करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पीआय, एपीआय यांचे सगळ्यांचे कॉल डिटेल्स घ्या. सरकारने कामाला लागावं नाहीतर वेगळं चित्र बघायला मिळेल असंही ते म्हणाले. ही माऊली मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागत आहे. तरीही वेळ मिळत नाही, फडणवीसांना सामान्य जनता पाहिजे की गुंड? असा प्रश्न उपस्थित होतोय असंही जरांगे पाटील म्हणाले.

follow us