छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यावरील हल्ला सुनील तटकरेंनीच; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यावरील हल्ला सुनील तटकरेंनीच; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil : छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांना झालेल्या (Patil) बेदम मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांनी कठोरातील कठोर कारवाई करावी. सोबतच मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना पदावरून हाकलून लावलं पाहिजे. असे लोक पदावर ठेवण्याच्या कामाचे नसतात असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

राज्यात अजितदादांचा पक्ष वाढतो आहे. चांगल्या तरुणांचा त्यांना पाठिंबा मिळतो आहे. मात्र, अशा नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर अशा मोठ्या पदांवर ठेवले तर ते असली हाणामारी करतात आणि त्याचा फटका अजित दादांना बसतो असंही ते म्हणाले आहेत. बहुतेक आम्हाला अशी शंका आहे की हा हल्ला तटकरे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच घडवून आणलाय. हा तटकरे साहेबांनी सांगून घडवून आणलेला हल्ला आहे. म्हणजे किती मराठा द्वेष आहे यांच्यात यातूनही दिसून आलं आहे असा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे.

विजय भैय्या हे शेतकऱ्यांचं लेकरू आहे. ते जर आज मागणी करायला गेलेत तर तुम्ही त्यांना मारता. म्हणजे हे तुम्हाला सोपं जाणार नाही. असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अजित दादांनी कठोरात कठोर कारवाई करून केवळ पदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हाकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी ही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर विजय घाडगे आणि परळी येथे ज्ञानेश्वरी मुंडे यांची आज भेट घेणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण, लातूर बंद; सूरज चव्हाण यांचा माफीनामा

मी पुणे दौऱ्यावर असतानाच ज्ञानेश्वरी मुंडे ताईंना भेटीसाठी येणार असल्याचे सांगितलं होतं. आज मी परळी येथे भेट घेत सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याच्या पतीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या विरोधात आम्ही राज्याचे एक नागरिक म्हणून उभे राहणार आहोत. सोबतच मुंडे ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. तसेच आज लातूरला जाऊन विजय भैय्या यांचे देखील तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी जात आहे. अशी माहितीही मनोज जरांगे पाटील यांनी यांनी दिली.

कुठल्याही मंत्र्याने आपल्या पदाची गणीमा राखली पाहिजे. आपण कुठल्या पदावर आहोत राज्याच्या जनतेचा आपण प्रतिनिधित्व करत आहोत. मात्र इथून पुढे देखील कोकाटे साहेबांनी आपल्या स्वभावात बदल करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर शेतकरी वर्ग त्यांच्या अंगावर जाईल. त्यामुळे त्यांनी मंत्री पदाची, विधान भवनाची आणि राज्यातील मायबाप जनतेची गणिमा आखली पाहिजे. नाहीतर पुढच्या काळात देखील त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube