आपल्यामध्ये इतके क्षमायाचनेचे भाव असतील तर आपण हिमालयात.. आव्हाडांचा आमदार धसांवर वार

  • Written By: Published:
आपल्यामध्ये इतके क्षमायाचनेचे भाव असतील तर आपण हिमालयात.. आव्हाडांचा आमदार धसांवर वार

Jitendra Awhad On Suresh Dhas : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas ) यांच्यावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट करत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राजकारण करुन पोळी भाजू नका, असा सल्लाही दिला आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

दुसर्‍याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्‍याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्‍यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा ज्याचा-त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही.

आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होणार; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावरून आव्हाडांचा वार

ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच, याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

माफी नाही

सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे…अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही, असंही जितेंद्र आव्हाड एक्सवर पोस्ट करत म्हणाले.

दुसर्‍याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्‍याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्‍यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते असंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube