Video : पुण्यात बार कर्मचार्‍यांची मुजोरी; मध्यरात्री २ तरूणांना जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

  • Written By: Published:
Video : पुण्यात बार कर्मचार्‍यांची मुजोरी; मध्यरात्री २ तरूणांना जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Youth beaten up in Pune : पुण्यातील बिबवेवाडी भागातल्या बारमधील कर्मचाऱ्यांकडून २ तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. काठी, दांडके, बांबूने जबर मारहाण करण्यात आली आहे. (Pune) पुण्यातील बिबवेवाडीमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या एका बारमध्ये तीन तरुण गेले होते. दारूच्या नशेत ते गोंधळ घालत होते, काही केल्या ऐकत नव्हते. बार मधील कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १२ वाजता हा सगळा प्रकार घडला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या एका बारमध्ये तीन तरुण दारू पिण्यासाठी गेले होते. दरम्यान, दारूच्या नशेत असल्याने त्यांनी बारमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावेळी कर्मचाऱ्याने त्यांना रोखलं. त्यावेळी कर्मचारी आणि दारूच्या नशेत असणाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला ढोल ताशा; पुणेरी शिवम ढोल पथकाचा आवाज घुमणार

बारचे नुकसान होईल यासाठी बारमधील कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत असणाऱ्या तिघांना बाहेर काढले. त्यावेळी बाचाबाची झाली. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या तिघांना बेदम मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी तिघांना मारहाण करण्यासाठी लाठी, काठ्या, दांडके तसंच, धारधार शास्त्राचा वापर सुद्धा केला. या मारहाणीत २ तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.

बारच्या बाहेर झालेल्या मारहाणीच्या घटेप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याचा तपास सुरू केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे. बारमधील आणि बाहेरील व्हिडीओ फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube