मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी; कॉल रेकॉर्डिंग झाली व्हायरल

मनोज जरांगे पाटील यांना धमकी आल्यानंतर विलास घुले खुन प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. बीडमधलं वातावरण पुन्हा एकदा याने ढवळून निघालं आहे.

News Photo   2026 07 05T212150.170

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी; कॉल रेकॉर्डिंग झाली व्हायरल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Jarange) पाटील यांना धमकी आल्याची बातमी समोर आली आहे. एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे, या कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय’ असे म्हणत या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जरांगे पाटील यांना शिविगाळ देखील करण्यात आली आहे. या कॉल रेकॉर्डिंगची कोणतीही पुष्ठी लेट्सअप मराठी करत नाही. विलास घुले हत्या प्रकरणासंदर्भातील ही कॉल रेकॉर्डिंग असल्याची माहिती समोर येत आहे.

विलास घुले खुन प्रकरणानंतर बीडमधलं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर रमेश घुले विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत आणि वाल्मीक कराड सोबत असलेल्या फोटो वरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. खासदार बजरंग सोनवणे यांचे परळीतील समर्थक बाळासाहेब पाथरकर यांनी रमेश घुलेंवर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानंतर एका व्यक्तीने बाळासाहेब पाथरकर यांना फोन केला.

जैन पत्रा उद्योगावर पोलिसांचा छापा, बीडमध्ये टाटा कंपनीची लोगो लावून बनावट पत्र्यांची विक्री

फोनवरून बोलताना त्या व्यक्तीने थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच शिविगाळ देखील केली आहे. ‘त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय’ असं या व्यक्तीने म्हटलं आहे. ही कथित कॉल रेकॉर्डिंग चांगलीच व्हायरल झाली आहे, या कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावाचा रहिवासी असलेला तरुण विलास घुले याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. विलास घुले हा हॉटेल व्यावसायिक होता. दोन गटात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेला असता, त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र या तरुणाच्या हत्येनंतर आत बीड जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे.

Exit mobile version