जैन पत्रा उद्योगावर पोलिसांचा छापा, बीडमध्ये टाटा कंपनीची लोगो लावून बनावट पत्र्यांची विक्री

समोर आलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून टाटा कंपनीचे अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून होते.

News Photo   2026 07 05T141710.975

बीडच्या जालना रोड परिसरात असलेल्या (Beed) जैन पत्रा उद्योग समूहावर टाटा स्टीलच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांसह छापा टाकला. टाटा कंपनीच्या नावाचा गैरवापर करून साध्या पत्र्यांवर टाटा नाव पंच करून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबईतील अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकत संबंधित व्यवसायिकाची चौकशी केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून टाटा कंपनीचे अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून होते. ठोस माहिती मिळाल्यानंतर या पथकाने पडताळणी करत चौकशी सुरू केली आहे. या चौकशी दरम्यान साध्या पत्र्यांवर टाटा कंपनीचे नाव प्रथमदर्शनी निदर्शनास आले. इथे असलेल्या उपलब्ध पत्रा आणि इतर साहित्यांची अधिकाऱ्यांनी तपासणी केली, त्याबरोबरच काही संशयित साहित्य जप्त केले आहेत. दरम्यान बीड मधील या पत्रा उद्योग समूहावर पडलेल्या छाप्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

Maharashtra Rain Alert : आज वादळी पाऊस; पुणे, अहिल्यानगर, बीडसह या जिल्ह्यांना येलो ऑरेंज अलर्ट

टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीसांची अद्यापही पडताळणी सुरू आहे. तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळा प्रकरणात जिल्हाधिकारी आता अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समीती स्थापन केली जाणार आहे. आठ दिवसात चौकशी समीती स्थापन करुन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समीती गठीत करण्यात येणार असून या समीतीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याबाबत आदेशित करणार आहे. सदरील प्रकरण गुंतागुंतीचे असुन अनेक न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. महाराष्ट्र मंदीर महासंघाच्या पाठपुराव्यानंतर महसूलमंत्र्यांनी चौकशी समीती स्थापन करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

सदरील इनामी जमीन मंदीर संस्थानच्या नावावर नसुन ही जमीन निजाम सरकारने चार मठांना तुळजाभवानी देवीच्या सेवेसाठी नियम अटी घालुन दिलेली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. देवस्थानच्या 4 हजार 121 एकर जमीनीतील 403 एकर जमीन न्यासाला अंधारात ठेवत खाजगी व्यक्तीच्या नावावर केल्याचा मंदीर महासंघाने आरोप केला आहे. तर 63 एकर जमीन कुळाच्या नावावर, आणि 158 एकर जमीन सातबारावर फेरफार झाल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे.

follow us