Manoj Jarange Patil Undertaking To Police : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Mumbai) मोर्चात निघाले. आता ते शिवनेरीवर दाखल झाले असून, 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी करत आहेत. मोर्चा सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) पोलिसांना हमीपत्र दिले आहे. या हमीपत्रात त्यांनी आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री दिली आहे.
बाहेर पडताना काळजी घ्या! मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट; घाटमाथ्यांवर ऑरेन्ज, कोकणाला यलो अलर्ट
हमीपत्रातील मुख्य आश्वासने
1. आंदोलनासाठी मिळालेली परवानगीची मूळ प्रत पोलीस अधिकाऱ्यांना दाखवली जाईल.
2. पोलिसांशी नियमित संपर्कासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती केली जाईल.
3. सभास्थळी पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील.
4. धरणे आणि निदर्शने सुव्यवस्थित रीतीने होतील, वाहतुकीत अडथळा येणार नाही.
5. सहभागी व्यक्तींची संख्या निश्चित मर्यादेत राहील.
6. स्वयंसेवक तैनात केले जातील आणि त्यांची यादी पोलिसांना दिली जाईल.
7. आंदोलन ठरवलेल्या ठिकाणीच होईल.
8. आंदोलन सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेतच होईल.
9. ध्वज/फलकाचे आकार आणि काठी निश्चित मर्यादेत राहतील.
10. हिंसक किंवा धोकादायक साधने जवळ ठेवली जाणार नाहीत.
11. कोणतीही चिथावणीखोर किंवा विभाजन करणारी भाषा वापरली जाणार नाही.
12. पोलिसांनी दिलेले सर्व कायदेशीर निदेशांचे पालन केले जाईल.
13. सार्वजनिक मालमत्ता किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला होणार नाही.
14. कोणत्याही प्रार्थनास्थळाची किंवा पवित्र वस्तूची हानी होणार नाही.
15. निर्दिष्ट ठिकाणावरून बाहेर जाणार नाही.
16. कोणतीही कागदपत्रे, प्रतिमा किंवा अन्न जाळले जाणार नाहीत.
17. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक किंवा जनसंबोधन साधने वापरली जाणार नाहीत.
18. कोणतीही वाहने, प्राणी किंवा वाहनसाधने आंदोलनस्थळी आणली जाणार नाहीत.
19. आयोजकांनी अनुयायांना नियंत्रणाखाली ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
20. हमीपत्रातील नियमांचे पालन पूर्ण केले जाईल आणि पोलिसांना सहकार्य केले जाईल.
बाहेर पडताना काळजी घ्या! मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट; घाटमाथ्यांवर ऑरेन्ज, कोकणाला यलो अलर्ट
परवानगीसंदर्भात…
राज्य सरकारकडून 29 ऑगस्टसाठी एका दिवसाची परवानगी मिळाली आहे. आझाद मैदानात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली असून, फक्त 5000 आंदोलकांना मैदानात उपस्थित राहता येईल, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चासाठी मुंबईत येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सरकारने दिलेल्या परवानगीच्या अटींचे पालन करत आंदोलन आयोजित केले जाणार आहे.