इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही! जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच भाजप नेत्यांकडून बॅनरबाजी…

BJP Banners Before Manoj Jarange Patil Reached Mumbai : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईकडे मोर्चात आहेत. काल अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या मोर्चाने आता शिवनेरीवर प्रवेश केला आहे. त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी दर्शवली (Mumbai Morcha) असून, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मोर्चाला भाजपकडून (BJP) बॅनरद्वारे प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल! मध्यरात्री पारनेरमध्ये जंगी स्वागत, पुण्यात वाहतूक व्यवस्था बदलली
बॅनरवर मजकूर नेमका काय?
– इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो.
– मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस.
– उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस.
भाजपचे आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन दावखरे आणि नरेंद्र पाटील यांनी या बॅनरबाजीसाठी जबाबदारी घेतली.
मुंबईत राजकीय वातावरण तणावपूर्ण
मोर्चा आणि बॅनरबाजीमुळे मुंबई शहरात राजकीय वातावरण तणावपूर्ण आणि उत्सुकतेने भरलेले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेचे आंदोलन आणि भाजपकडून दिलेले संदेश यामुळे आता राज्यातील राजकीय चर्चेत नवीन वळण आले आहे.
मोर्चा आणि बॅनरबाजीमुळे मुंबईत राजकीय वातावरण तणावपूर्ण आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेचे आंदोलन आणि भाजपकडून दिलेल्या संदेशामुळे राज्यातील राजकीय चर्चेला नवीन दिशा मिळाली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे की, पुढील काही दिवसांत या आंदोलनाचा राजकीय आणि सामाजिक परिणाम कसा दिसून येतो.