Download App

Maratha reservation : अन्यथा, …मोठा निर्णय घ्यावा लागेल! मनोज जरांगे पाटलांचा थेट सरकारला अल्टीमेटम

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परत एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil Warning To Mahayuti Government : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परत एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे. जरांगे यांनी म्हटले की, आमच्या नोंदी आहेत; कोणीही आरक्षणापासून मराठा समाजाला रोखू शकत नाही. समाजाला संयम ठेवण्याचे आव्हान आहे, पण आमची हानी कोणालाही होऊ देणार नाही.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र

त्यांनी सरकारला स्पष्ट सांगितले की, 17 सप्टेंबरपूर्वी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे. जर निर्णय तातडीने झाला नाही, तर त्यांना मोठा निर्णय घ्यावा लागेल. जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह उपसमितीला स्पष्ट सूचित (Maratha reservation) केले की, गावागावातील समिती कामाला लावा आणि जीआरनुसार नोंदी आणि प्रमाणपत्रांची प्रक्रिया पूर्ण करा.17 सप्टेंबरआधी कुणबी प्रमाणपत्रं देण्याची प्रक्रिया सुरू करा. हैदराबाद गॅझेटच्या नोदींच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायला लागा. अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, असं त्यांनी सरकारला बजावलं आहे.

आरक्षणाच्या मुद्यावर सरकारवर दबाव?

जरांगे यांनी सरकारला थेट आव्हान दिले की, येवलावाल्यांचे ऐकू नका. तुम्ही आमच्या मागे लागले, आता आम्ही तुमच्या मागे लागू. वेळ आल्यावर जशाच तसे बघू. कुणाच्याही विरोधामुळे मराठा समाजाच्या हक्काची हानी होऊ देणार नाही. जर कोणत्याही प्रकारचा बदल झाला, तर 1994 चा जीआर रद्द करण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढला असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा सुरू आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले, मात्र स्पष्ट सांगितले की, समाजाच्या हक्कांवर कुणी हात ठेवू शकणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजात उत्सुकता आणि तणाव दोन्ही वाढले आहे. आरक्षणाच्या मुद्यावर सरकारवर दबाव अधिक प्रबल झाला आहे.

follow us