आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेल्या शिंदेंच्या आमदारांना हाकललं; नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

Maratha Protester on Eknath Shindes MLA नांदेड बंदला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या शिंदेंचे आमदारांना मराठा कार्यकर्त्यांनी हाकलून दिले.

Maratha Protester Agressive On Eknath Shindes MLA

Maratha Protester Agressive On Eknath Shindes MLA

Maratha Protester agressive on Eknath Shindes MLA in Nanded : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतरही तोडगा निघू शकलेला नाही. याच्या समर्थनार्थ मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी नांदेड शहरात बंदची हाक दिलेली आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदेंचे आमदार गेले होते. मात्र त्यांना या आंदोलनातून मराठा कार्यकर्त्यांनी हाकलून दिले.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताना सैफ अली खान झाला होता नर्व्हस; बिग बींनी केली होती ‘ही’ खास मागणी

नेमकं प्रकरण काय?

जालन्यातील आंतरवाली साराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथे सकल मराठा समाज, नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरू आहे. त्याचबरोबर तेथे आज नांदेड शहरात बंदची हाक दिलेली आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंदराव पाटील बोंढारकर हे आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र त्यांना येथे आंदोलकांच्या ताव्र रोषाला सामोरं जावं लागलं.

महापुराच्या तडाख्यात गावं वाहून गेली; एक घर मात्र खंबीरपणे कसं उभं राहिलं?, कारण आलं समोर

नांदेडमध्ये या बंदला व्यापारी आणि नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच मराठा आंदोलकांनी रॅली काढली होती. याच रॅलीमध्ये एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंदराव पाटील बोंढारकर हे आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र यामध्ये त्यांना पाहताच आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी या आमदारांना रोखले, विरोध दर्शवला, इथे आंदोलनात फोटो काढायला कशाला येता. असं म्हणत त्यांना चक्क आंदोलनातून हाकलून दिलं

 

Exit mobile version