Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच आज उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या राज्यातील सर्वपक्षांयांची बैठक बोलावली असून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापुरातील आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
जवानाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; संडेला अॅडव्हान्स बुकिंगद्वारे जबरदस्त कमाई
अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असून इतर समाजाच्या आरक्षणाला कसलीही अडचण होणार नाही, याचा सरकार विचार करत असून त्यासाठीच उद्या सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. इतर पक्षांना काय वाटतं? यातून मार्ग कसा काढायचा? यावर चर्चा होणार आहे, शेवटी चर्चेतूनच मार्ग निघणार असल्याचं विधान अजित पवार यांनी केलं आहे.
Lok Sabha Election : BJP-JDS युतीवर संकट? कुमारस्वामींच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!
मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु ते समजून घेत नाहीत. ओबीसी घटकाला अडचण होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे लागतील, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण दिलं होतं. नंतर देवेंद्र फडणवीसांनीही दिलं. परंतु कोर्टात टिकलं नाही. जे गरीब आहेत, अशांना आरक्षण मिळालं पाहिजे., असंही ते म्हणाले आहेत.
‘बायडेन यांना भारतात आणण्यासाठी 12 हजार कोटी मोजले का’? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल
https://www.youtube.com/watch?v=rlwffoiEfxw
आमच्यावर कोणाचाही दबाव नव्हता :
काही जण सांगतात, आमच्यावर दबाव होता. होय, आमच्यावर लोकांची कामे करायचा दबाव होता. अडीच वर्षांत सरकारमध्ये हाती घेतलेली कामे करण्याचा दबाव आहे. आमदारांच्या कामांना स्थगिती मिळाली होती. हे कामे सुरू करण्याचा आमच्यावर दबाव होता. पण इतर दबावाला भीक घालणारे आम्ही माणसे नाहीत. मी पण मराठ्यांची औलाद आहे. शेतकऱ्यांची औलाद आहे. दुसरा आमच्यावर दबावच असू शकत नाही, असा दावाही अजित पवारांनी केला आहे. एकनाथ शिंदेंबाबत, माझ्याबाबत काही बातम्या येत आहेत. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.