Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. त्यात मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, विविध समाजांचे प्रश्न निर्माण होतात. तेव्हा ते पक्षीय राजकारणाच्या पलिकडे असतात. त्यामध्ये सरकार, विरोधी पक्ष आणि इतर पक्ष यांनी सर्वांनी मिळून समाज हिताचा विचार करायचा असतो.
काल दिल्लीला अन् आज भीमाशंकरला…. मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त; संजय राऊतांचे टीकास्त्र
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्यामध्ये जेव्हा मराठा समाजाप्रमाणे विविध समाजांचे प्रश्न निर्माण होतात.तेव्हा ते पक्षीय राजकारणाच्या पलिकडे असतात. त्यामध्ये सरकार, विरोधी पक्ष आणि इतर पक्ष यांनी सर्वांनी मिळून समाज हिताचा विचार करायचा असतो. एकमत करायचं असतं. त्यामुळे आज आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीमागे देखील हाच हेतू आहे. आपल्याला कोणत्या मार्गाने पुढे जाता येईल आणि विविध समाजांचे प्रश्न असतील. त्यात मनोज जरांगे आणि इतर मराठा संघटनांच्या मागण्या, समस्यांवर यामध्ये चर्चा होणार आहे.
🕐 1pm | 11-9-2023 📍 Nagpur | दु. १ वा. | ११-९-२०२३ 📍 नागपूर.
LIVE | Media interaction.#Nagpur #Maharashtra https://t.co/Qrt02Hx6z5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2023
तयारीचे आदेश आले! विधानसभेसाठी हडपसरमधून पवारांचा हुकमी एक्का मैदानात उतरणार
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. लोकशाहीमध्ये उपोषण करून आपली मागणी लावून धरणं योग्य आहे. मात्र सर्वांनी मिळून यावर काय मार्ग काढता येईल याचा विचार करावा. कारण सरकारला कायद्याचा देखील विचार करावा लागतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विचार करावा लागतो. कारण ते कायद्याच्या चौकटीत टिकले देखील पाहिजे. अन्यथा ही समाजाची फसवणुक होईल.
त्याचबरोबर सरकार ओबीसी समाजावर देखील अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेऊन मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज समोरासमोर यावेत हे घडू नये यासाठी सरकार प्रयत्न करेल. तसेच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कोणत्याही समाजाच्या बाजूने मत मांडताना विचार करून बोलावं. कोणीही दुखावणार नाही याची काळजी घ्यावी अस आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.