एकनाथ शिंदे तुम्ही शहाणे व्हा, अन्यथा संपणार..मनोज जरांगे यांचा खुलेआम इशारा

एकनाथ शिंदे तुम्ही जर शहाणे झाले नाहीत तर राजकारणातून संपून जाल, या शब्दांत मनोज जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदेंना इशारा दिलायं.

Manoj Jarange

Manoj Jarange

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तुम्ही जर शहाणे झाले नाहीत तर राजकारणातून संपून जाल, या शब्दांत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खुलेआम इशाराच दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आंतरवली सराटीत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या 12 व्या दिवशी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी चांगलीच आगडोंब केलीयं.

“…तर जशास तसं उत्तर देऊ”; भरत गोगावलेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा!

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, एकनाथ शिंदेंना मराठ्यांच्यात मारामाऱ्या लावायच्यात. देवेंद्र फडणवीस आरक्षण देऊ शकत नाही? हे मान्य करावं. गोळ्या केवळ तुमच्याकडे नाही मराठ्यांच्या पोरांकडेही आहेत. एक जरी गोळी लागली तर मराठ्यांची पोरं नरडं फोडून खातील. एकनाथ शिंदेंवर माझा जीव पण मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करणं अमान्य 12 सप्टेंबरला निर्णय होणारच मुंबईत येणारच आहोत. सरकार रडक्या अवलादीचं आहे, मर्दासारखं खरं सांगण्याची यांच्यात हिम्मत नाही, अशी सडकून टीकाही मनोज जरांगे यांनी केलीयं.

सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू; विखे पाटलांना जरांगेंचा थेट इशारा

तसेच एकवर्षभर विखेंनी घात केला. तुम्ही संयम सोडा आणि मराठ्यांचे मुडदे पाडा. तुमचं मतदान तर गेलंच राजकारणातून आता तुम्ही गेलेच, शिंदेंविषयी चांगलं बोललो तेव्हा मराठा समाज बरा गोड लागला आता तुमच्या राजकारणाला आम्ही कात्री लावणार असल्याचाही इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदेंना म्हणावं, ही नाटकं खेळू नका, मराठे मराठ्यांच्या अंगावर सोडायचे. मगतर लवकर संपशील लय. शहाणा हो लवकर नाहीतर एका फटक्यात संपशील, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच जरांगे यांनी उदय सामंत यांनाही फटकारले. उदय सामंत म्हणतात आम्ही अजूनही संयम बाळगून आहोत. संयम नसला तर तू काय करणार आहेस? तू आणि संजय शिरसाट दोघे छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल करण्याविषयी फोनवर बोलले होते. एकाने हाणल्यासारखं आणि एकाने मारल्यासराखं करायचं, ही तुमची योजना होती. एकनाथ शिंदे आणि उदय सामंतला मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावायच्या आहेत आणि दंगल करायची असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Exit mobile version