Download App

शिंदेंचा दूत लोणावळ्यात दाखल; जरांगेंचं वादळ मुंबईच्या वेशीवरच थांबणार?

  • Written By: Last Updated:

लोणावळा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने पुढे पुढे सरकत आहे. येत्या 26 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहे. काल (दि.24) पुण्यात जरांगेंच्या मोर्च्याला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता जरांगेंना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून छ. संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय सरकारचे दोन शिष्टमंडळदेखील लोणावळ्यात दाखल झाले आहेत. (Manoj Jarange Patil Maratha Rally Update) 

Manoj Jarange : ‘ट्रॅप रचणाऱ्यांची नावे मुंबईत जाहीर करणार’; मनोज जरांगेंचा थेट इशारा

जरांगेंचा मोर्चा काल (दि.24) पुण्यातून मार्गस्थ होत लोणावळ्यात दाखल झाला असून, आज ते मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. त्याआधी छ. संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड जरांगेची मनधरणी करण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले आहेत. अर्दड यांच्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. आता जरांगे सरकारच्या विनंतीला मान देत आंदोलन स्थगित करतात की मुंबईकडे वाटचाल चालूच ठेवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे हे मनुवादी, मुंबईच्या आंदोलनात घातपात…; उपराकार लक्ष्मण मानेंचे धक्कादायक दावे

जरांगेंच समाधान होईल 

दुसरीकडे, जरांगेंची भेट घेण्यापूर्वी अर्दड यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की,  जरांगेची भेट घेणार असून, त्यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणार आहे. शासनााचे आदेश घेऊनच त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आजची चर्चा  सकारात्मक होईल आणि  मनोज जरांगेंचे समाधान होईल असा विश्वासही अर्दड यांनी व्यक्त केला आहे.

पहिले समाजाशी चर्चा अन् मग शिष्टमंडळ

एकीकडे जरांगेंना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. छ. संभाजीनगरचे विभागीय आयुक्तांशिवाय जरांगेशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दोन शिष्टमंडळदेखील लोणावळ्यात दाखल झाले आहेत. मात्र, या सर्वांशी चर्चा करण्यााआधी मी समाजातील लोकांशी बोलणार आहे. त्यानंतरच सरकारी अधिकाऱ्यांची बोलणार असल्याचे जरांगे पाटलांनी स्पष्ट केले आहे. जर तर वर आपला विश्वास नसून, आंदोलकांना मुंबईकडे गाड्यांचे तोंड करून ठेवा असे सांगणार आहे. निर्णय झाला तर, ठीक अन्यथा चलो मुंबई यासाठी आम्ही तयार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले आहे.

‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली

न्यायालयाच्या नोटीशीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईकडे कूच करत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, जरांगे यांची पदयात्रा मुंबईत न येण्यासाठी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईलच, आमचे वकील न्यायालयात जाणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे.

follow us