Download App

Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरून मराठा समाज आक्रमक; एक गट मवाळ तर दुसऱ्याचा विरोध कायम

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन उपोषण झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचा सध्या राज्यव्यापी दौरा सुरू आहे. या दरम्यान अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून राजकीय पुढार्‍यांना गावबंदी देखील करण्यात आली होती. तसेच कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी देखील मराठा समाजाकडून सरकारला विरोध करण्यात आला आहे.

>Manoj Jaranage यांचं देहू, आळंदीत रात्री 3 वाजता जंगी स्वागत; भुजबळांवर पुन्हा साधला निशाणा

मात्र यानंतर आता मराठा समाजामध्ये फूट पडल्याचे दिसून आली. कारण कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरून समाजातील एक गट मावळ भूमिका घेताना दिसतोय. तर दुसऱ्या गटाचा विरोध मात्र अद्यापही कायम आहे. गुरूवारी 23 नोव्हेंबरला राज्यभरात कार्तिकी एकादशीचा उत्सव आहे. त्यात कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठालाच्या शासकीय महापूजेचा मान हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना असतो. त्यात मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी या पूजेला विरोध केला होता.

IND VS AUS Final: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या घरी ईडीचा छापा; भारतीय संघाच्या पराभवानंतर मोईत्रांचा भाजपला टोला…

त्यानंतर आता समाजाच्या एका गटाने मवाळ भूमिका घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठालाच्या शासकीय महापूजेला विरोध नसल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसऱ्या गटाने मात्र उपमुख्यमंत्री जर पूजेला आले तर त्यांना विरोध करणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान अद्याप पंढरपूरच्या विठ्ठल रूख्मीणी मंदीर समितीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण महा पूजेला येणार याबाबतचा विधी व न्याय विभागाचा कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अद्याप हेच ठरलेले नाही की, कोणते उपमुख्यमंत्री महापूजेला येणार देवेंद्र फडणवीस की, अजित पवार त्या अगोदरच मराठा समाजाने आपली भूमिका आक्रमक केली आहे. त्यामुळे आता गुरूवारी पंढरपूरात काय चित्र असणार याकडे संपूर्णं राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मनोज जरांगे (Manoj Jaranage ) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. त्यात रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या देहू आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीला भेट दिली. त्यावेळी रात्री 3 वाजता जंगी स्वागत करण्यात आलं त्यावेळी देखील मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तर यावेळी जरांगेंनी भुजबळांवर पुन्हा निशाणा साधला.

follow us