Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून राजकीय पुढार्यांना गावबंदी देखील करण्यात आली होती. तसेच कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी देखील मराठा समाजाकडून सरकारला विरोध करण्यात आला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेला विरोध करणाऱ्या मराठा समाजाला आवाहन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे.’
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना दणका! मुलगी अन् सुनेविरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल
‘त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे.’ असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे.
या दरम्यान कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेला विरोध करणाऱ्या मराठा समाजामध्येच दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरून समाजातील एक गट मावळ भूमिका घेताना दिसतोय. तर दुसऱ्या गटाचा विरोध मात्र अद्यापही कायम आहे. गुरूवारी 23 नोव्हेंबरला राज्यभरात कार्तिकी एकादशीचा उत्सव आहे. त्यात कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठालाच्या शासकीय महापूजेचा मान हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना असतो. त्यात मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी या पूजेला विरोध केला होता.
समाजाच्या एका गटाने मवाळ भूमिका घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठालाच्या शासकीय महापूजेला विरोध नसल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसऱ्या गटाने मात्र उपमुख्यमंत्री जर पूजेला आले तर त्यांना विरोध करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता गुरूवारी पंढरपूरात काय चित्र असणार याकडे संपूर्णं राज्याचे लक्ष लागले आहे.