Maratha Reservation Protest Bombay High Court Hearing : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. या सुनावणीत मराठा आंदोलकांच्या बाजूने सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर राज्य सरकारकडून बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली.
मोठी बातमी! हैदराबाद गॅझेट लागू होणार, आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेणार; सरकारचा मनोज जरांगेंना शब्द
या सुनावणीवेळी, ‘मराठा आंदोलक हे सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. आंदोलनकर्त्यांना (Manoj Jarange Patil) केवळ आझाद मैदानात थांबण्याची परवानगी होती. मात्र, या नियमाचे उल्लंघन झाले’, असे मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईचा परिसर आणि आझाद मैदान खाली करण्याची मुदत संपल्यानंतर आज 2 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
छगन भुजबळ आक्रमक; कागदपत्रे दाखवत म्हणाले ‘…म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही’
उच्च न्यायालयाकडून मराठा आंदोलकांवर ताशेरे
उच्च न्यायालयाने यानंतर पुन्हा झालेल्या सुनावणीत मराठा आंदोलकांवर ताशेरे ओढले आहेत. ‘आझाद मैदानात आंदोलनासाठी केवळ 24 तासांची परवानगी दिली होती. मग तुम्ही तिथे अजून का थांबला आहात?’, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारण्यात आला. यावर ‘आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत’, असं मनोज पाटील यांचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले. तसेच ‘आतापर्यंत 54 मोर्चे शांततेत झाले आहेत’, असं मनोज जरांगेंचे (Manoj Jarange Patil) वकीलांनी सांगितले. यावर ‘तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसले आहात तुम्हाला परवानगी नाही’, असं उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.
सुनावणीदरम्यान मनोज जरांगेंचे वकील काय म्हणाले?
मनोज जरांगेंचे (Manoj Jarange Patil) वकील सतीश मानेशिंदे सुनावणीदरम्यान म्हणाले की, ‘31 मे ला आम्ही पहिला अर्ज केला, 25 जुलैला दुसरा अर्ज केला.त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक केली मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही. ती जागा सत्याग्रहासाठी आहे का तर हो 5000 हजार लोकांना परवानगी होती का तर हो’ अशी जरांगेंच्या वकिलांनी भूमिका घेतली.
‘ऋतुचक्र’ प्रेमगीत प्रदर्शित! ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार? तारीख समोर…
राज्य सरकरकडून काय सांगण्यात आले?
राज्य सरकारकडून बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले की, ‘काही भागात अजूनही मोठ्या प्रमाणात वाहन आहे. काही लोक ऐकत आहेत तर काही अजिबात ऐकत नाही आहेत. काल रात्रीपासून पोलीस रस्त्यावर असून आम्ही आंदोलनकर्त्यांना विनंती करत आहोत. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना नोटीस देण्यात आली असून आम्ही त्यांना जागा खाली करायला सांगितलं आहे. जरांगे यांनी लिखित स्वरूपात किंवा लोकांना आवाहन करून आंदोलनकर्त्यांना मुंबई सोडण्यास सांगाव’ असं सराफ म्हणाले.
त्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्याकडून उद्यापर्यंतचा वेळ मागण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाबाबतची सुनावणी उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर दुपारी 1 पर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे एकप्रकार हा मनोज जरांगेंना दिलासाच असल्याचं बोललं जात आहे.