गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही! कोर्टाच्या निर्णयानंतर… आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

Maratha Protesters Reaction On Bombay High Court Instructions : मराठा आरक्षणासाठी (Manoj Jarange Patil) सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांच्या आंदोलनावर आज (2 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने मुंबईतील (Mumbai) बिघडलेल्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला कठोर आदेश दिले. आझाद मैदानावरील आंदोलकांनी मात्र ठाम भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. गोळ्या घातल्या तरी आम्ही हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत शांती प्रस्थापित करा, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई केली जाईल. तसेच गरज पडल्यास न्यायालय स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा (Manoj Jarange Patil) आढावा घेईल, असा इशारा दिला. या प्रकरणावर पुढील सुनावणी आज दुपारी तीन वाजता होणार आहे.
कोर्टाच्या सुनावणीतील प्रमुख मुद्दे
– दुपारी तीनपर्यंत मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणावी – राज्य सरकारला आदेश.
– सरकारच्या कारवाईबद्दल न्यायालय समाधानी नाही.
– आंदोलकांनी न्यायालयाला घेराव घालणे अयोग्य ठरवलं.
– परवानगी नसताना आझाद मैदान अडवणे मान्य होणार नाही, जागा तातडीने मोकळी करावी.
– आदेश पाळले नाही, तर न्यायालय थेट कारवाई करेल.
आंदोलकांची न्यायालयातील बाजू
– आंदोलकांकडून जर कुणाला त्रास झाला असेल तर माफी मागण्यात आली.
– 5 हजार लोकांना परवानगी असूनही, पार्किंगसह मूलभूत सोयींचा अभाव असल्याची तक्रार.
– माध्यमांमुळे गर्दी वाढल्याची नोंद.
– आम्ही कायद्याचे पालन करीत आहोत आणि शांततेत आंदोलन सुरू आहे, असा दावा.
“मनोज जरांगे शरद पवारांचं नाव का घेत नाही, सर्वात आधी मी जरांगेंना..”, आ. लाड यांनी काय सांगितलं?
न्यायालयाचे सरकारला स्पष्ट आदेश
– तीन वाजेपर्यंत दक्षिण मुंबई रिकामी करावी.
– परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर न्यायालय स्वतः आढावा घेईल.
– आदेश न पाळल्यास कोर्टाचा अवमान समजून कारवाई होईल.
– स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्या, कारण भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलकांचा ठाम पवित्रा
न्यायालयाच्या आदेशानंतरही आझाद मैदानावरील आंदोलकांनी ठाम भूमिका घेतली. ‘आरक्षण मिळेपर्यंत आम्ही एक इंचही मागे हटणार नाही. मनोज दादा इथे आहेत, तोपर्यंत मराठा बांधव हलणार नाहीत. आम्हाला गोळ्या घालाव्या लागल्या तरी आम्ही हटणार नाही. आरक्षण द्या, मगच आम्ही गावाकडे परतू,’ असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. आता दुपारी होणाऱ्या सुनावणीत मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.