Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला असून राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊना आपला राजीनामा दिला आहे. तर, काहींना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
Sensex; दोन दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स पुन्हा घसरला, पण गुंतवणूकदारांचे भांडवल वाढले
मात्र ठोस निर्णय होत नसल्याने आमदार निलेश लंके यांच्या मतदार संघात गावकरी आक्रमक भूमिका घेऊ लागले आहे. मराठा आरक्षणावर ठोस भूमिका न घेणाऱ्या मराठा आमदार, खासदार यांचा सकल मराठा देसवडे ग्रामस्थांच्या वतीने प्रतिकात्मक अंत्यविधी करून दशक्रिया विधी करण्यात आला.
पारनेरमध्ये नेत्यांची अंत्ययात्रा
पारनेर तालुक्यातील देसवडे गावात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुठलीही ठोस भूमिका न घेणाऱ्या राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राज्य सरकारचा निषेध असो’, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
Maratha Reservation : आरक्षणासाठी राजीनामा सत्र सुरूच…; ठाकरे गटाच्या नगरसेविकेनं दिला राजीनामा
या वेळी आंदोलनकर्त्यांनी तिरडी बांधून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे फोटो असलेला बॅनर बांधून चार खांदेकरी व पाचवा पाणोड्या, अशी प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढली. तसेच समोर पोस्टर घेऊन जात या नेत्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील केली.
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्य उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव म्हणून ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत. यातही मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. नेत्यांच्या घरांना आणि वाहनांना आग लावली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे.